पुणेकर

पुणेकर आपल्या मुलाला खुप मारत होता.

शेजारी :- का मारता आहात मुलाला ?

पुणेकर :-अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते,
हा गाढव दोन पाय-या सोडून चढला.....

शेजारी :- अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना...

पुणेकर:- अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात....😂😂😂

लेटेस्ट पुणेरी किस्सा

लेटेस्ट पुणेरी किस्सा 😜

जोशी : "मी इथले टाॅयलेट वापरु का ?"

नेने : "हो, पण पैसे पडतील....!"

जोशी : "नाही पडणार.... बसताना काळजी घेईन....!!"

आम्ही भाजीला 'एक्स' मानल आहे..!

गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या

डब्यात चपाती बुडवून खात होते...

मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही...

गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स'
मानल आहे..!

केस कलर कर

एका आजोबांच्या डोक्यावर फक्त ८ केस..आजोबा सलुन मध्ये जाऊन खुर्चीत बसले

दुकानदाराने विचारले मोजु की कापु?

आजोबा म्हणाले कलर  कर ...कलर....                                                             

टूथपेस्ट

दुकानदार: आमच्या टूथपेस्ट मध्ये तुलसी, कापूर, निलगिरी, लवंग आहे..

.
.
.
.
बंड्या: नक्की काय करायचं आहे ब्रश करायचं का तोंडात यज्ञ करायचांय..                                                          

रामदास समर्थ स्थापित ११ मारुती

 समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

1) शहापूर

सातारा जिल्ह्यातील कराड-मसूर रस्त्यावर असलेल्या शहापूर या गावी समर्थ रामदासांनी पहिल्या मारुतीची स्थापना केली. शहापूरमधील मारुतीची स्थापना समर्थांनी शके 1566 मध्ये केली. हनुमानाची मूर्ती 6 फूट उंचीची आहे. हा मारुती शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे.

2) मसूर

सातारा जिल्ह्यातील शहापूरजवळच पुणे-मिरज मार्गावर मसूर गावी समर्थांनी दुसऱ्या मारुतीची स्थापना केली आहे. मसूरच्या हनुमानाची मूर्ती 5 फूटी असून ती पूर्णपणे चुन्यात बनवण्यात आली आहे. या मारुतीची स्थापना शके 1567 मध्ये करण्यात आली आहे.

3)चाफळ

समर्थ रामदासांनी चाफळमध्ये 1569 मध्ये शिष्य आणि गावकऱ्यांच्या मदतीनं राममंदिराची स्थापना केली. या राममंदिरात शके 1570 मध्ये दास मारुती आणि प्रताप मारुतींची स्थापनाही समर्थांनी केली आहे. प्रतापमारुतीला भीममारुती किंवा वीरमारुती म्हणूनही ओळखलं जातं.

4)शिंगणवाडी

साताऱ्यातील चाफळजवळच शिंगणवाडी टेकडीवर समर्थांनी हनुमानाचं स्थापना केली. शके 1571 मध्ये या मारुतीची स्थापना करण्यात आली. हा मारुती खडीचा मारुती किंवा बालमारुती म्हणूनही ओळखला जातो. चाफळपासून अगदी जवळ असल्यानं चाफळमधील तिसरा मारुती म्हणूनच या मारुतीची ख्याती आहे.

5) उंब्रज

सातारा जिल्ह्यातील उंब्रज गावी समर्थ रामदासांनी मारुतीची स्थापना केली. चाफळहून रोज स्नानासाठी उंब्रजला रामदास स्वामी जात असत. त्यामुळे त्यांनी उंब्रजमध्ये मारुतीची स्थापना केली असावी असा समज आहे. शके 1571 मध्येच उंब्रजच्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिराशेजारीच कृष्णा नदीचा काठ आहे. हा मारुती उंब्रजचा मारुती किंवा मठातील मारुती म्हणूनही ओळखला जातो.

6) माजगाव

माजगावच्या सीमेवर घोड्याच्या आकाराचा एक दगड होता. याला ग्रामस्थ ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजत असत. समर्थ रामदास माजगावला गेले असता ग्रामस्थांनी त्यांना या मारुतीची प्रतिष्ठापना करण्याची विनंती केली. त्यानंतर शके 1571 मध्ये समर्थांनी या सातव्या मारुतीची स्थापना केली.

7) बहे-बोरगाव

साताऱ्यातील वाळवे तालुक्यात कृष्णा नदीकाठी बहे-बोरगावमध्ये शके 1573 मध्ये समर्थांनी मारुतीची स्थापना केली.   कृष्ण महात्म्यात या परिसराचा उल्लेख बाहुक्षेत्र असा आढळतो.

8) मनपाडळे

कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा आणि पन्हाळगडजवळील मनपाडळे गावी समर्थांनी मारुतीची स्थापना केली आहे. शके 1573 मध्ये या मारुतीची स्थापना करण्यात आली आहे. साडेपाच फूट उंचीची मूर्ती उत्तराभिमुख आहे.

9) पारगाव

कराड कोल्हापूर रस्त्यावरील वाठार गावापासून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर पारगावमध्ये समर्थांनी मारुतीची स्थापना केली. शके 1574 मध्ये मारुतीची स्थापना करण्यात आली. 11 मारुतींमध्ये उंचीनं सर्वात लहान मूर्ती असून तीची उंची दीड फूट आहे.

10) शिराळा 

सांगलीतील सापांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळा गावी समर्थांनी शके 1576 मध्ये मारुतीची स्थापना केली. 7 फूट उंच चुन्याची मूर्ती उत्तराभिमुख आहे. सुर्योदय आणि सुर्यास्ताला मूर्तीच्या चेहऱ्यावर सूर्याची किरणं पडतात.

मिठीतली 'मी' पहिली की दुसरी..?

बायको : ए, सांग ना मिठीतली 'मी' पहिली की दुसरी..?
🤔

नवरा : अॅ..? आता हे काय..?
😯 

बायको : अरे सांग ना पहिली की दुसरी..?
😠
.
.
.

(चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ नवऱ्याला लपवता येत नव्हता)
.
.
.
.

बायको : अरे लवकर सांग, माझं काम अडलंय.
😡

नवरा : तुला ते का जाणून घ्यायचंय..? 
😕
.
.
.

बायको : अरे लेख लिहितेय मी, *'मिठी'* की *'मीठी'* लिहू..?
माझा गोंधळ झाला ना. त्यातून मी इंग्लिश मिडियमची आहे. You know ना, माझ्या किती चूका होतात. म्हणून विचारलं *मिठीतली* मी पहिली की दुसरी...!
😌

😄😄😆नवरा मरता मरता वाचला😆😆😂😂😂🤣🤣

अष्टविनायक यात्रा परिचय

अष्टविनायक दर्शन :अष्टविनायक दर्शन कसे करावे ?

अष्टविनायक दर्शनाचा क्रम आणि अंतर |


अष्टविनायक दर्शन कसे करावे

१. पहिला गणपती - मोरगांवचा श्री मयुरेश्वर

२. दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर

३. तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर

४.चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक

५. पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी

६. सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

७. सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर

८. आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती


अष्टविनायक यात्रा परिचय

गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. आपले इच्छित कार्य सफल व्हावे यासाठी सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे शुभाशीर्वाद घेतले जातात. अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ देवळे होय. ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत. आजच्या धावपळीच्या आयुष्यात या आठ गणपतीच्या मंदिरांना भेट देण्याने मनाला शांत आणि शिथिल वाटते.

अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट’ आणि ‘विनायक’ या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती होय. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. कारण विद्येचे दैवत असलेला हा गणपती सर्व विघ्नांना दूर करून समृद्धी प्रदान करतो. ही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेली आहेत. ही आठही मंदिरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ठ असून ती मनाला सुखावह वाटतात.

अष्टविनायकाची तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन पवित्र गणपतींच्या मंदिराचे दर्शन घेणे होय. या प्रत्येक मंदिरांचा स्वतःचा असा एक स्वतंत्र इतिहास आणि त्यासोबत जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे. आणि ही सर्व माहिती तितकीच अद्वितीय आहे जितक्या प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मुर्त्या विलक्षण आहेत. या प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तीचे रूप आणि गणपतीच्या सोंडेची ठेवण ही एकमेकांपासून भिन्न आहे. असे म्हटले जाते की ही यात्रा पूर्णत्वास नेण्याकरिता सर्व आठ गणपतींचे दर्शन घेतल्यावर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे. या प्रत्येक आठही देवळातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून अतिशय जागृत आहे असे मानले जाते. या विविध देवळांमध्ये मोरश्वर, महागणपती, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर आणि वरद विनायक अशी गणपतीची वेगवेगळी नांवे आहेत.

ही मंदिरे मोरगांव, रांजणगांव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महड येथे वसलेली असून ती पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात स्थित आहेत. या ८ मंदिरांपैकी ६ ही पुणे जिल्ह्यात आणि २ रायगड जिल्ह्यात असूनसुद्धा तुलनेने पुण्याहून जवळ पडतात.


अष्टविनायक दर्शनाचा क्रम आणि अंतर 

पहिला गणपती - मोरगावचा श्री मयुरेश्वर

मोरगांव हे पुण्याच्या आग्नेय (दक्षिणपूर्व) दिशेला स्थित आहे. ते पुण्याहून सासवड-जेजुरी मार्गे केवळ दोन तासांच्या अंतरावर आहे. अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ हा मोरगांव येथील श्री मयूरेश्वराच्या दर्शनाने केला जातो.

पुण्यापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगांव या गावी कऱ्हा नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर स्थित आहे. या परिसराला 'भूस्वनंदा' या नांवानेसुद्धा ओळखले जाते. मोरगांव याचा शब्दशः अर्थ मोरांचे गांव असा आहे. कोणे एके काळी या गांवाचा आकार हा मोराप्रमाणे तर होताच शिवाय येथे भरपूर प्रमाणात मोरांची वस्ती होती. म्हणून या गांवाला मोरगांव म्हटले जाते. अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते.

अष्टविनायक मंदिरांमध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे.  हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फुट उंचीची तटबंदी आहे. मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत. मंदिरात प्रवेश करताच सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहेत. या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहे. यामुर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे. मंदिरात रिद्धी (बुद्धी) आणि सिद्धी (क्षमता) यांच्यासुद्धा मुर्त्या आहेत.

जवळची इतर दर्शनीय स्थळे

  • पांडवांनी बांधलेले पांडेश्वर मंदिर. अंतर अंदाजे १२ किमी
  • जेजुरीचे श्री मल्हारी मार्तंड खंडोबाचे देऊळ. अंतर अंदाजे १७ किमी
  • जेजुरीपासून दोन किमी अंतरावर लवथळेश्वर हे शिवमंदिर. अंतर अंदाजे १९ किमी
  • सासवड येथीर संत सोपान महाराज यांची समाधी. अंतर अंदाजे ३४ किमी
  • नारायणपूर येथील एकमुखी दत्ताचे मंदिर, शिवमंदिर, बालाजी मंदिर आणि पुरंदर किल्ला. अंतर अंदाजे ४२ किमी   

दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर

मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे श्री सिद्धेश्वर हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो.

हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा यागावापासून ४८ किमी अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर स्थित आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे. मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो.

सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फुट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे. ही गणपतीची स्वयंभू मूर्ती एका पितळेच्या चौकटीत स्थित आहे. गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मुर्त्या स्थित आहेत. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय फलदायक आहे. एक प्रदक्षिणा म्हणजे ५ किमीचा प्रवास कारण ही मूर्ती डोंगराला जोडलेली आहे. एका प्रदक्षिणेला जवळजवळ अर्धा तास लागतो.

जवळची इतर दर्शनीय स्थळे:

  • पेडगांव येथील भीमा नदीच्या तीरावरील प्राचीन मंदिरे आणि किल्ला. अंतर अंदाजे ९ किमी
  • राशीन येथील झुलती दीपमाळ आणि देवीचे मंदिर. अंतर अंदाजे २१ किमी
  • रेहेकुरी येथील अभयारण्य. अंतर अंदाजे ३१ किमी
  • भिगवण येथील पक्षी अभयारण्य. अंतर अंदाजे २७ किमी
  • दौंड येथील भैरवनाथ आणि श्री विठ्ठल मंदिर. अंतर अंदाजे २६ किमी

तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर

पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिर हे कोकणातील रायगड जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक-पाषाण-बालेवाडी-महामार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे. महामार्गावरील खोपोली टोल नाक्याहून यु टर्न घेऊन डावीकडे वळावे आणि लगेच उजवीकडे आणि पुलाच्या दक्षिणेला इमॅॅजिका मार्गे सुधागढजवळ पाली स्थित आहे.

पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे. हे मंदिर मुंबई-पुणे महामार्गे मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे येथून ११ किमी अंतरावर पाली येथे आहे. हे मंदिर कोकणातील रायगढ जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक-पाषाण-बालेवाडी-महामार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे. महामार्गावरील खोपोली टोल नाक्याहून यु टर्न घेऊन डावीकडे वळावे आणि लगेच उजवीकडे आणि पुलाच्या दक्षिणेला इमँजिका मार्गे सुधागढजवळ पाली स्थित आहे.

एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चामरे धरलेले दिसून येतात. मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजडीत आहे. ही बल्लाळेश्वराची मूर्ती तीन फुट उंच आहे.

हे मंदिर अशाप्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सुर्याद्याच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिश्याच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवलेले आहे.

साधारणतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की इथे गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो.

या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणेच ही गणपतीची मूर्ती आहे. जेव्हा या डोंगराच्या फोटोला बघून गणपतीची मूर्ती पाहिल्यावर हे साम्य विशेष करून जाणवते.

जवळची इतर दर्शनीय स्थळे

  • मंदिराच्या जवळच सरसगड नावाचा किल्ला आहे. अंतर अंदाजे २.३ किमी
  • सुधागड या किल्ल्यात भृगु ऋषींनी स्थापन केलेले भोराईदेवीचे देऊळ आहे. अंतर अंदाजे ११ किमी
  • पालीपासून तीन किमी अंतरावर सिद्धेश्वर येथील शंकराचे स्वयंभू मंदिर.
  • पालीपासून चार किमी वर उध्दर हे स्थान जिथे रामाने जटायूचा उद्धार केला
  • पालीपासून तीन किमी अंतरावर गरम पाण्याचे झरे असलेले उन्हेरे हे स्थान
  • पुई येथे एकवीस गणेश मंदिरे आहेत. अंतर अंदाजे २३ किमी
  • ठाणाळे येथे कोरीव लेणी आहेत. अंतर अंदाजे १३ किमी

चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक

पालीपासून दोन तासांच्या अंतरावर खोपोलीजवळ इमॅॅजिका मार्गे महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे.

वरदविनायक या रूंपात हा गणपती सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो. पुणे-मुंबई महामार्गापासून तीन किमी दूर खोपोली जवळ आणि पुण्याहून ८० किमी दूर हे मंदिर मुंबईच्या जवळ स्थित आहे. पालीपासून दोन तासांच्या अंतरावर खोपोलीजवळ इमॅॅजिका मार्गे महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे

१९८० मध्ये श्री धोंडू पौडकर यांना मूर्ती तळ्यात सापडली होती. ही देवळाच्या गाभाऱ्याच्या बाहेर आहे. मूर्तीची अवस्था एकदम वाईट होती, म्हणूनच देवळाच्या ट्रस्टींनी तिचे विसर्जन केले आणि त्याजागी नवीन मूर्तीची स्थापना केली. काही लोकांनी यावर हरकत घेतली आणि कोर्टात केस दाखल केली. म्हणून आता इथे आपल्याला दोन मुर्त्या दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि एक गाभाऱ्याच्या आंत. एक मूर्ती आहे जी शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या दिसतात आणि मग गणपतीच्या दोन मुर्त्या. या मुर्त्या पूर्वाभिमुख आहेत. या देवळात एक नंदादीप अखंड तेवत आहे. असे म्हणतात की हा नंदादीप १८९२ पासून अखंड जळतो आहे. मंदिराच्या चारी बाजूला ४ हत्तींचे पुतळे आहेत. मंदिराचा हॉल ८० फुट लांब आणि ८० फुट रुंद असून शिखराची उंची २५ फुट असून ते सोनेरी आहे. शिखरावर नागाची नक्षी आहे.

हे एकच असे मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतः नैवेद्य दाखवू शकतात.

जवळची इतर दर्शनीय स्थळे:

  • बोरघाटाच्या पायथ्याला खोपोली येथे योगीराज गगनगिरी महाराजांचा आश्रम. अंतर अंदाजे १११ किमी
  • खंडाळा व लोणावळा ही थंड हवेची ठिकाणे. अंतर अंदाजे १२६ किमी
  • कार्ले येथील कोरीव लेणी व एकवीरा मातेचे मंदिर. अंतर अंदाजे १०९ किमी
  • संत तुकाराम यांचे वास्तव्य असलेले देहू हे स्थळ. अंतर अंदाजे १४७ किमी

पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी

थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली-जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे.

हे मंदिर पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गे २२ किमी अंतरावर आहे. मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे. थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली-जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे.

चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा-मुठा नदीच्या मार्गाला जोडते. मंदिराच्या संकुलाच्या आंत एक छोटे शिवमंदिर आहे.

चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.

जवळची इतर दर्शनीय स्थळे:

  • थेऊरच्या दक्षिणेकडील डोंगररंगांमध्ये भुलेश्वराचे प्राचीन आणि प्रेक्षणीय शिवमंदिर आहे. अंदाजे अंतर ४० किमी
  • श्री नारायण महाराज यांचा आश्रम व दत्तमंदिर पुणे-दौंड मार्गावर केडगांव येथे आहे. अंदाजे अंतर ४३ किमी
  • थेऊरजवळील लोणीपासून सुमारे चार ते पाच किमी अंतरावर रामदरा हे ठिकाण आहे. येथे पाण्याने वेढलेले शिवमंदिर आहे. अंदाजे अंतर ४ ते ५ किमी
  • थेऊर फाट्याओअसून जवळच पुणे-सोलापूर महामार्गावर उरळीकांचन येथे महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला निसर्गोपचार आश्रम आहे. अंदाजे अंतर १३ किमी
  • वाघोली-केसनंद या मार्गावर वाडेबोल्हाई मंदिर आहे. अंदाजे अंतर १३ किमी
  • पुणे-नगर मार्गावर तुळापुर येथे भीमानदीकाठी संगमेश्वर मंदिर आणि छत्रपती संभाजीमहाराज यांचे स्मारक आहे. अंदाजे अंतर २१ किमी

सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे.

लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरीजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते १८ गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर ८ व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा संबोधिले जाते.

या मंदिरापर्यंत पोचण्यास ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केल्या जाते. देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत.

असेसुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला १८ लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात.

जवळची इतर दर्शनीय स्थळे:

  • छत्रपती शिवाजीमहाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला. अंतर ६.२ किमी
  • ओतूर येथे प्राचीन कपर्दिकेश्वर मंदिर आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्यस्वामी यांची समाधी. अंतर १७ किमी
  • कुकडी नदीच्या उगमाजवळील कुकडेश्वर मंदिर. अंतर ८.६ किमी
  • माळशेज घाटातील अभयारण्य. अंतर २८ किमी
  • ऐतिहासिक नाणेघाट. अंतर ३३ किमी

सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर

हे देऊळ लेण्याद्रीपासून २० किमी आणि ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

देऊळ लेण्याद्रीपासून २० किमी आणि ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे गणपतीने विघ्नासुर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात. विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा असासुद्धा होतो.

या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. गणपती त्याचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो. या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करते की गणपतीच्या भक्तांनीसुद्धा स्वतःच्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे. देवळाच्या भिंतींवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत. देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत. मंदिर २० फुट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल १० फुट लांब आहे. पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणिकाचे आहे. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत. गणपतीच्या मुर्तीच्यावर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत. देवळात लहान लहान खोल्या आहेत. यांना ओवऱ्या म्हणतात. इथे बसून भक्त ध्यान करू शकतात.

जवळची इतर दर्शनीय स्थळे

  • भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग. अंतर अंदाजे ७८ किमी
  • आर्वी हे उपग्रह केंद्र. अंतर अंदाजे १३ किमी
  • खोडद येथे आशिया खंडातील सर्वात मोठी आकाश दुर्बीण बसविलेली आहे. अंतर अंदाजे २१ किमी
  • संत ज्ञानेश्वर यांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले त्या रेड्याची समाधी आळे येथे आहे. अंतर अंदाजे २७ किमी

आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती

पुणे-अहमदनगर मार्गावर ओझरपासून २ तासावर हे मंदिर स्थित आहे. आणि पुन्हा मोरगांवच्या श्री मयुरेश्वराचे दर्शन घेण्याने अष्टविनायक यात्रा संपन्न होते.

पुणे-अहमदनगर मार्गावर ओझरपासून २ तासावर हे मंदिर स्थित आहे. अष्टविनायक यात्रेतील आठवे मंदिर हे महागणपतीचे असून ते सर्वात शक्तिशाली आहे असे मानले जाते. असे म्हणतात की त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्याआधी शंकराने गणपतीची इथे आराधना केली होती.

हे पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधलेले आहे की दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी-सिद्धी त्याच्या सोबत आहेत. हा गणपती स्वयंभू आहे. भक्तांचे असे मानणे आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून असे म्हणतात की त्या मूर्तीला १० सोंडी आणि २० हात आहेत. या मूर्तीला 'महोत्कट' म्हणतात. पण ती मूर्ती अस्तित्वात आहे कां याविषयी कोणालाच काही खात्रीशीर माहिती नाही.

हा महागणपती अतिशय शक्तिशाली असून गणेशउत्सवात रांजणगांवचे गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करीत नाहीत. तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात.

ही स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपती मांडी घालून कमळावर आसनस्थ आहे. त्याचे कपाळ एकदम रुंद असून त्याची सोंड डावीकडे आहे. 

जवळची इतर दर्शनीय स्थळे

  • वडू बुद्रुक येथील संभाजी महाराजांची समाधी. अंदाजे अंतर २७ किमी
  • निघोज येथे कुकडी नदीच्या पात्रात खडकांमध्ये रांजणाच्या आकाराचे नैसर्गिक खळगे बघावयास मिळतात. अंदाजे अंतर २७ किमी
ही आठही मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत आणि या मंदिरांना भेट देण्याचा एक ठराविक क्रम आहे. परंपरेनुसार तीर्थयात्रा मोरगांवच्या मोरेश्वराच्या दर्शनाने सुरु होते. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगांव याक्रमाने मंदिरांना भेट देण्यात येते. या तीर्थयात्रेची सांगता मोरगांवच्या मंदिराला पुन्हा जाण्याने होते.

अष्ट विनायक यात्रा कां करतात?

अष्टविनायक यात्रेकरिता भक्तमंडळी इतकी आतुर कां असतात याचे कारण अतिशय सोपे आहे: ते मानतात की केवळ या आठ मंदिरांना भेट देऊनच गणपतीचे खऱ्या प्रकारे दर्शन घडू येऊ शकते. अशी ही त्यांची गहन श्रद्धा त्यांना या मंदिरांकडे खेचून घेऊन येते. या मंदिरांचे दर्शन घेण्याने त्यांना आनंद तर मिळतोच पण त्याशिवाय एक प्रकारची मानसिक शुद्धतादेखील मिळते. या मंदिरांमध्ये गणपतीचे दर्शन घेण्याने त्यांची गणेशभक्ती अधिक गहिरी आणि अधिक सात्विक होते. शिवाय असे मानले जाते की या सर्व मंदिरातील मुर्त्या या स्वयंभू असून त्यांच्या निर्मितीत मानवी हातांचा स्पर्शसुद्धा झालेला नाही. म्हणूनच या देवळांमध्ये गणपतीचे दर्शन हे त्याच्या सर्वात सात्त्विक अवतारामध्ये मिळते. शिवाय आजकालचे आपले आधुनिक जीवन ताणतणावाचे असते. निसर्गरम्य अशा जागी स्थित असलेल्या या देवळांना भेट दिल्याने मनाला हलके वाटते, शांत वाटते, प्रसन्न वाटते आणि पुन्हा आपली कर्तव्यपूर्ती करण्यासाठी ही यात्रा एक वेगळीच उर्जा प्रदान करते.