स्वप्नातल्या रंगमहाली एक परी मी पहिली

स्वप्नातल्या रंगमहाली एक परी मी पहिली
अश्रु नयनी ल्यालेली ती नाजूक पण हिरमुसली

स्वप्नांच्या या मोहक देशी दु:ख कसे दाटले
वाटले मज हर्ष सारा सुख येथेच नांदले

जवळी कसे जावे मी अन काय कसे हे पुसावे
रडावे मी तीच्या सम कि, हसण्याला सांगावे

जणू वीणेची तंग तार अवखळपणे छेडली
त्याच स्वरात रंगुनी ती पुढे बोलली

स्वप्नांची हि दुनिया सुखी कशी रे वाटली
वास्तवाच्या सुख थेंबाला स्वप्न कुंभे आटली .

घेउनी आस वास्तवाची सुख स्वप्ने तू पहिली
वास्तवाची वाट सोडूनी स्वप्नेच तू निरखली

रडणे हे आज माझे नसे रे मजसाठी .
एक इशारा दिला मी हा समज रे तुजसाठी .

अशीच पहिली स्वप्ने जर तू मला रड्लेलीच पाहशील .
वास्तवात भान सोडूनी स्वप्नात रमत जर राहशील

नको घाबरू कशी होतील स्वप्ने सारी आठवून
हो तयार वास्तवात धैर्य मनात साठवून

कोण होती हि परी मला काही सुचेना
उपदेश तिचा कानातुनी कधीच जाइना

पूर्तता मी म्हणुनी ती गुप्त क्षणात जाहली .
परत तिला मी हसताना वास्तवातच पहिली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा