Tuesday, August 23, 2011

swatahcha dukhat chur asan tar nehamichach

स्वतच्या दुखात चूर असणं तर नेहमीचचं..

कधीतरी इतरांची अनाम दुख अनुभवून बघ..

स्वताला कधी आजमावून बघ..

स्वताच्याच दुखात थोडं हसून बघ..दुखात हरवून जाऊन..

जगणं विसरण्याइतकं आयुष्य स्वस्त नाही..

अनमोल जीवनाला एक स्पर्श तर करुन बघ..साद घालतील तुला गीत तुझेच..

शब्द ज्यांचे कधी तू विसरली होतीस..

जमेल सुरांची मैफल पुन्हा..

स्वतामधला आवाज ऐकून तर बघ..पुन्हा रंग उजळून येतील..

तूच अपुर्‍या सोड्लेल्या चित्राचे..

कुंचले घेऊन ,थोडे रंग भरुन बघ..खुणाऊ लागेल मोकळे आकाश तुला..

पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी..

पायातल्या सगळ्या बेड्या तोडून टाक..

बंधनं सगळी झुगारुन दे..

तुझ्या पंखांना थोडं आत्मविश्वासाचं बळ देऊन बघ..नव्या वाटांवरचे निशिगंध फुलू लागतील..

आठवणींच्या वाटेवर थोडं थांबून बघ..

हिरवळीकडॅ एकदा पाहून..

नवीन श्वास अंतरात भरुन तर बघ..शक्य आहे सगळं..

जगता येण्यासारखं खुप आहे आणखी..

थोडं चाकोरीबाहेर जाऊन तर बघ..

स्वताला नवीन जन्म घेण्याची..

एक संधी देऊन बघ....

No comments:

Post a Comment