व. पु. प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारी


भक्तीभाव...असामान्य असं काही नसतं. ज्याला जसं परवडेल तसा तो राहतो. 
पूजेसाठी कुणी फुलं घेतो, कुणी सुवर्ण घेतो. 
स्वत:च्या कुवतीप्रमाणे जो तो साधनं निवडतो.
ती गौण नसतातच . ती नाममात्र असतात. 
प्रश्न असतो भक्तीभावाचा! शंभर वर्ष तप करून शंकराला एकेक शीर
अर्पण करणारा लंकाधिपती असतो, 
तर तुळशीच्या पाणावर दैवताला जिंकणारेही असतात

सौंदर्य...
'स्त्री? ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं,
'तुला बुद्धी हवी का सौंदर्य??
तेंव्हा ती स्त्री म्हणाली,
'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे!?
'का??
'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, 
पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.? 

ज्योत...
?ज्योत? म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं.
सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. 
कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून? 
आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, 
झंझावातालाही असतं. 


स्वाभाविक....
त्यांनी बघावं म्हणून मी इथं येत नाही. इट् इज अ पार्ट ऑफ द् गेम! पुरूष पाहणारच.
स्वाभाविक गोष्टींवर् चिड्ण्यात अर्थच नसतो. 
भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही, अणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करत नाही. 
फुलणं हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारानी, रसिकांनी कमळाकडे पहावं, भुंग्याकडे पहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं. 



जबाबदारी...
?जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक सांगाल??
"ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधीकधी दहा-बारा हजारांचा एखादा
दागिना सांभाळायचा असतॊ. ते इतरांनाही माहित नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी.."
"प्रेम, मैत्री, संगोपण, शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदारया. 
त्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली."

"ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?"

"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते. 
ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं." 






पार्टनर
पोरगी म्हणजे झुळुक! अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही.

आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणुस न जाणं हाच नरक.

तुला मी हाक कशी मारु? पार्टनर ह्याच नावाने.
आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं.

लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणुन मला तू हवा आहेस.

कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.

दु:खं, आनंद, जय, पराजय, हसु, आसु, जन्म, मरण, विरह-मिलन, सगळं तसच असतं .प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं, एवढच काय ते नविन. पुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हेच मरण.

समुद्राची ताकद टिटवीला समजत नाही.
आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही.
सुगंधाचं कोडं फ़ुलाला उमलत नाही.
एवढासा तू, त्याहुन एवढासा मी मला जिवनाचा अर्थ कसला विचारतोस?आणी त्याहीपेक्षा संभोगाचा अर्थ लावायचा असतो, हे तुला कोणी सांगितले?
पाणी म्हणजे एच टू ओ.इथचं सगळे थांबलेले आहेत.मुर्ख म्हणुन नव्हे तर जाणकार म्हणुन थांबले.
पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणुन.
कोणता आनंद क्षणजीवी नाही?
दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर चव. खाली उतरला की घास.
सुगंधाचं नातं नाकाशी.घशातुन आत गेल्यावर ति फ़क्त हवा.
खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं नातं रसिकतेशी नसुन तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की रसीकता संपली.
इतर अनेक गरजांप्रमाणे "तृप्ती" जी एक गरज आहे.
जो गरजु आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो.व्यवहार नेहमी साधतोच असं नाही.तो सत्यासारखा कटू असतो.
ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटूता निर्माण होते.
सध्या एकच वर्तमान्काळ सांभाळ. 


निर्णय घेता न येन ह्यासरखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेता येण्या पेक्षा चुकीचा निर्णय घेणे अधिक बरे. चुकीचा निर्णय घेनारया मानासनी जीवनात यश मिलावलेले आहें. परन्तु जो निर्णय घेवु शकत नाही त्याचे मन हे करू की ते करू ह्या गोंधलात घुन्तलेले असते. मात्र हा मनुष्य कधीही यशस्वी ज़ल्याचे ऐकिवीत नाही. त्याला कृति करता येत नाही आणि ज्याला कृति करता येत नाही त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिलवता येत नाही. 
-व पु 


चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जितकं प्रखर, तितकं सौम्य. चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!
माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.
ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती?
उपवास करणार्यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल.
पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार?
त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे.
समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात. 




एक मांजर सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळं मांजराला स्वत:ची लांबपर्यंत पसरलेली सावली दिसली. मांजर म्हणालं,'आज कमीत कमी एखादा घोडा मारून खाल्ल्याशिवाय भूक भागायची नाही.'सूर्य वरवर येऊ लागला.सावलीकडे पाहून मांजर म्हणालं,'घोड्याची काही जरूरी नाही. एखादी शेळी सुद्धा चालेल.'सूर्य आणखी वर आला. सावलीची लांबीही त्याप्रमाणात कमी झाली.मग मांजर म्हणालं,'एखादा ससाही चालेल.'ऐन दुपारी सावली पायांतळीच आली. तेंव्हा मांजर व्याकूळ होत म्हणालं,'फक्त एक उंदराचं पिल्लू पुरे.'

व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेंव्हा ते 'पूर्णत्व'. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा