व. पु. ची काही वाक्ये

प्रत्येक माणूस हे एक कोड आणि प्रत्येक माणूस एकदाच हे आणखी एक कोड
- आपण सारे अर्जुन 


आम्ही 'सहन करतो, सहन करतो', हे इतका वेळ तुम्ही सांगीतलेत...
ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाही. तुम्ही दु:ख वाटत सुटलात. 
जो सहन करतो, तो बोलत नाही...... 


Success is a relative term. More success, more relatives. 


चांगुलपणाच्या कृतीचं, कृती संपताक्षणीच विस्मरण व्हावं. कापूर जळतो, तशा त्या आठवणी जलून जाव्यात....
कापूर जळला की, राखेच्या रुपाने ही त्याचं अस्तित्व रहात नाही. त्याप्रमाने सत्कृत्याच्या आठवणीचं पुढच्याच क्षणी विस्मरण व्हावं. 


"आम्ही कोरडे पाषाण असतो म्हणुनच आम्ही रडवू शकतो. ज्याला दगड लागतो, ठेच लागते तो विव्हळतो. ज्याच्यामुले ठेच लागली त्या दगडाला पाझर फुटल्याचं कधी पाहिलंस का..????" 


कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....... पण गगन भरारीच वेड रक्तातच असाव लागत.... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही ! 


आकाशात जेंव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेंव्हा गुरूत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पीटाळून लावे पर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वता गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो. 

असच माणसाच आहे... 
समाजात विशिष्ट उंची गाठे पर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. 


प्रयत्नात ढिलेपणा नको
कष्ट करतांना सवलत नको 
महत्वकांक्षेला मर्यादा नको
आणि
आपल्याइतक्याच पॊटतिड्केन दुसरी व्यक्ती
आपल काम करेल ही भ्रांत नको
प्रयत्न करत असतांना निर्णय घेणारी आणखी एक
शक्ति आहे, ह्याच भान ठेवाव.आपण प्रयत्नात ढिलाई केली नाहि
हे समाधान कोणीही हिरावुन घेउ शकत नाहि. 



यश म्हणजे ताटाभोवती ची रांगोळी.सतत अस्तित्व दर्शवणारी.रांगोळीचा भुकेशी संबंध नाही.म्हणुनच ती पचवण्याचा प्रश्न उदभवत नाही. अपयश हे वाढलेल्या ताटासारख.अन्नावर वासना नसली तरी ते वाढ्ण गिळाव लागत, पचवाव लागत. चेहरयाची रंगोळी विस्कटु न देता. 



माणसाने मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यावर परिणाम होतो. 


पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो तेवा काही वाटत नहीं ..
तो अंगावरच सुकतो तेव्हा त्याचंही काही वाटत नाही..
सुकला नाही तरी ओल्याची सवय होते..
पण म्हणुन कुणी ओलाच शर्ट अंगात घाल म्हटलं तर कसा वाटतं?? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा