आज मी तिला सगळ सांगणार होतो

आज मी तिला सगळ सांगणार होतो,
मनातील घुसमट अलगद मांडणार होतो..
प्रेमात वेडेपणाची मर्यादा मी आज तोडणार होतो,
वाटले होते प्रेम व्यक्त करावं..
तिच्या सहवासात मनसोक्त जागावं,
तिला माझ्यात सामावून घ्यावं..
आणि स्वतः तिच्या हवाली व्हावं,
पण रात्रभर मी विचार केला..
जर ती नाही म्हणाली तर..?????
प्रेमाचा स्वप्नमहाल बनण्या आधीचं,
कोसळला तर..?????
असे वाटते तिच्या मनात काय आहे,
याची चाहूल घ्यावी
तिलाही प्रेम व्यक्त करण्याची,
एक संधी द्यावी..
मला ती आवडते हा माझा स्वार्थ आहे,
तिला मी आवडत नसेल कदाचित..
तिचा विचारही सार्थ आहे,
म्हणून मग मी ठरवले
काहीच बोलायचे नाही..
प्रेम गमवावे लागले तरी चालेल,
पण..?????
मैत्री गमवायची नाही..

1 टिप्पणी:

  1. एकदम छकार कविता ! आपल्या खऱ्या भावना सगळयांनाच व्यक्त करता येत नाहीत. ज्यांना त्या व्यक्त करता येतात ते अशी कविता करतात. लई भारी. शेवटचे शब्द वादातीत !!!!! प्रेम गमवावे लागले तरी चालेल, पण ......... मैत्री गमवावची नाही.

    उत्तर द्याहटवा