Saturday, March 17, 2012

हो आहे मी वेडा....

हो आहे मी वेडा....

घराला 'विसावा' किंवा 'शांती' नाव देऊन घरात सगळ्यांशी यथेच्च भांडणारे जर 'सभ्य' असतील ना... तर हो आहे मी वेडा...
गांधीजींच्या विचारांचं भांडवल करून त्यांचीच प्रतिमा असलेल्या नोटांसाठी राजकारण करणारे जर 'चाणाक्ष' असतील ना... तर हो आहे मी वेडा...
शाळा-कॉलेजात नेहमी पहिल्या नंबर वर येणारे पण वाचन, कला, संगीत, सौंदर्य यापैकी कशाचाही गंध नसणारे जर 'हुशार' असतील ना... तर हो आहे मी वेडा...
अमेरिकेची सुधारती आर्थिक स्थिती याबद्दल बोलणारे पण स्वतःच्या देशातली गरिबी हटवू न शकणारे जर 'विचारवंत' असतील ना... तर हो आहे मी वेडा...
परदेशात Six digit salary कमावणारे पण मायदेशी आपल्या आप्तेष्टांच्या सुखं-दुखात सामील होऊ न शकणारे जर 'विद्वान' असतील ना... तर हो आहे मी वेडा...
आणि आपल्या फायद्या साठी सगळ्यांशी गोड-गोड बोलणारे जर 'चांगले' असतील ना... तर हो आहे मी वेडा...

आहे मी वेडा...

3 comments:

  1. सर्व वेडे होतील असा मस्त विचार

    ReplyDelete
  2. Wt a great thoughts, really excited me.

    ReplyDelete