मैत्री

मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते
खरंखुरं शहाणपण.



कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही.



मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं



मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक



मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खऱ्या मैत्रिणी मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात



मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली



मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा