चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जन्म दुसऱ्याने दिला.

जन्म दुसऱ्याने दिला.
नाव दुसऱ्याने दिले.
शिक्षण दुसऱ्या कडून घेतले.
लग्न दुसऱ्याने जुळवले.
कामावर दुसऱ्याने लावले.
शेवटी स्मशनातही दुसरेच नेणार ... 
तरीही माणूस इतका घमंड का करतो?

हरवलेल्या वस्तू

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. "आपलं आयुष्य"..
म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!! 

जीवनातिल कडवे सत्य

"जीवनातिल कडवे सत्य"
अनाथ आश्रमात मूले असतात, "गरीबांचे"...
आणि...
वृद्धाश्रमात म्हातारे असतात " "श्रीमंतांचे"....!!!

मी दुनियेबरोबर "लढु" शकतो

मी दुनियेबरोबर "लढु" शकतो
पण "आपल्या माणसांबरोबर" नाही,
कारण "आपल्या माणसांबरोबर"
मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !! 

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात
म्हणुन मनातल्या गोष्टी
जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा
कारण त्याने मन हलके तर होईलच
आणि लढण्याची ताकद पण येईल...!

जपून टाक पाउल ...

जपून टाक पाउल ... 
इथे प्रत्येक वाट आपली नसते 
जपून ठेव विश्वास 
इथे प्रत्येक माणुस आपला नसतो 
जपून घे निर्णय
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो 
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, 
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.. 
जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात 
ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, 
तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन......!

कुणाच्या सांगण्यावरुन

कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात 
एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट 
मत बनवण्यापेक्षा, 
आपण स्वतः चार पावले चालुन 
समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन 
मगच खात्री करा. 
नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ... 
बोलताना शब्दांची उंची वाढवा 
आवाजाची उंची नाही. 
कारण.. पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, 
विजांच्या कडकडाटामुळे नाही..
आणि वाहतो तो झरा असतो 
आणि थांबतं ते डबकं असतं..
डबक्यावर डास येतात 
आणि झऱ्यावर राजहंस!! 
“निवड आपली आहे.." 
कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही 
हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल 
हे सांगता येत नाही. 
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, 
अन्... भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

गुलाबी थंडीत

गुलाबी थंडीत, तुझ्या कुशीत शिरावे,
काळ्याभोर केशसंभारात हात गुंफावे,
तुझ्या टपोरी डोळ्यात हरवून जावे,
देवाजवळ एकच प्रार्थना, हे सगळे खरे व्हावे
 


गुलाबी थंडीत दोघं,
अन हा गार गार वारा,
फक्त तुझ्या मिठीत...
दिसे स्वर्ग सारा



बर्फासारख्या थंडीमद्धे,
तुझ्या मिठीत लपावस वाटत
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावस वाटत...!!




तुझ्या मिठीत आल्यावर अस वाटत
वेळेन पण थोड थांबाव ...
आणि तुझ्या माझ्या प्रेमाच हे नात..
आयुष्यभर असच राहव.....



झोंबते हि गार हवा
बघ कसा माझ्या तनी.
सांगु कसे साजना तुजला
मज आता लाज येते मनोमनी.


ओथंबलेला गारवा सांगुनी गेला
मज काही सारे...
तुझ्या उबदार स्पर्शालाही
भिजुनी टाकतात हे गार वारे.!!

मैत्री

मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते
खरंखुरं शहाणपण.



कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही.



मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं



मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक



मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खऱ्या मैत्रिणी मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात



मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली



मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे

पाऊस

कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.



मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा.



जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे,
तसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे,
पाऊस येतो आणि जातो
साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो.



मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून.



कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो......



तू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन,
तुझ्या डोळ्यात येऊ,
पाहणारा अश्रूंचा पाऊस,
तुला माझ्या डोळ्यात दिसेल.



पाऊस कधीचा पडतो,
झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने.



ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.



तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.





नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,
पाऊस पडायला लागल्यावर.



पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा......
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा....



रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,
चंद्र रडत होता.



आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो



ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.



अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले.... :)
मग क्षण भर मी पाहतच राहिलो...
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले.... ;) <3

प्रेम

प्रेम करावे डोळसपणे
त्यात नको घाई,
फसवणूक झालीच तर
त्याला ग्राहक मंच नाही.

बंध तुझे माझे
असेच जुळुनी राहू देत,
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहू देत.

होकारांला शब्दांना
महत्व नसते
दाटल्या भावानांना
काही बंध नसते,
डोळेच सांगून जातात
हाल हृदयाचे,
प्रेमात शब्दांची
गरज नसते .

चंद्र आणि चांदण्याचे खेळ
आता जुने झाले
तुझ्या येण्याने माझ्या
गजबजलेल्या शहराचे रस्ते
आता तुझ्या जाण्याने सुने झाले

रात्रभर तूझ्या आठवणीत मी
ताऱ्यानांसुध्या झोपू दिले नाही
रातभर त्या जागल्या पण
माझा विरह त्यांना कळलाच नाही

तू बरोबर नसतांना तुझ्या सोबत
फक्त तुला पाहनं
आणि नसताना तुझ्यासोबत
आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलण.

छोट्याशा या आयुष्यामध्ये
खूप काही हव असत,
असंख्य चांदण्या भरूनसुद्धा
आपल आभाळ रिकाम असत.

चंद्राच्या रुपात मला
तुझं मनमोहक रूप दिसाव,
माझं मन त्यात मग
तुकडा तुकडा फसाव .

चारोळ्या.............

न क्षणांची ओळख
दोन क्षणांची मैत्री
मला का वाटली
कोणीतरी सोबत असल्याची खात्री


त्या दिवशीही जेंव्हा ति
समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही
मनात सारे गेले राहुन
शब्दच आज सुचलेच नाहीत


ओठांनी अबोल असली
तरी डोळे खुप काही बोलायचे
मनातील वादळ नकळत
खुप काही लपवायचे


तुझ्या स्वप्नील डोळ्यांत
मी स्वतःला शोधत होतो
तुला हसताना पाहुन
मी नेहमीच हरवत होतो


भावनांच्या एका दुरच्या
गावी एक वेडा राहातो
क्षणोक्षणी जागेपणी
तुझी स्वप्ने पाहातो


मनातले सारे तिला सांगण्याचे
मी नेहमीच ठरवत होतो
समोर ति आल्यावर मात्र
नेहमीच मी घाबरलो होतो


असेच नेहमी घडत होते
मन माझे झुरत होते का जाणे
तुझी एक झलक पाहाण्यासाठी
डोळे मात्र झुरत होते...