चारोळ्या.............

न क्षणांची ओळख
दोन क्षणांची मैत्री
मला का वाटली
कोणीतरी सोबत असल्याची खात्री


त्या दिवशीही जेंव्हा ति
समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही
मनात सारे गेले राहुन
शब्दच आज सुचलेच नाहीत


ओठांनी अबोल असली
तरी डोळे खुप काही बोलायचे
मनातील वादळ नकळत
खुप काही लपवायचे


तुझ्या स्वप्नील डोळ्यांत
मी स्वतःला शोधत होतो
तुला हसताना पाहुन
मी नेहमीच हरवत होतो


भावनांच्या एका दुरच्या
गावी एक वेडा राहातो
क्षणोक्षणी जागेपणी
तुझी स्वप्ने पाहातो


मनातले सारे तिला सांगण्याचे
मी नेहमीच ठरवत होतो
समोर ति आल्यावर मात्र
नेहमीच मी घाबरलो होतो


असेच नेहमी घडत होते
मन माझे झुरत होते का जाणे
तुझी एक झलक पाहाण्यासाठी
डोळे मात्र झुरत होते...

चारोळ्या.............

न क्षणांची ओळख
दोन क्षणांची मैत्री
मला का वाटली
कोणीतरी सोबत असल्याची खात्री



त्या दिवशीही जेंव्हा ति
समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही
मनात सारे गेले राहुन
शब्दच आज सुचलेच नाहीत



ओठांनी अबोल असली
तरी डोळे खुप काही बोलायचे
मनातील वादळ नकळत
खुप काही लपवायचे



तुझ्या स्वप्नील डोळ्यांत
मी स्वतःला शोधत होतो
तुला हसताना पाहुन
मी नेहमीच हरवत होतो



भावनांच्या एका दुरच्या
गावी एक वेडा राहातो
क्षणोक्षणी जागेपणी
तुझी स्वप्ने पाहातो





मनातले सारे तिला सांगण्याचे
मी नेहमीच ठरवत होतो
समोर ति आल्यावर मात्र
नेहमीच मी घाबरलो होतो


असेच नेहमी घडत होते
मन माझे झुरत होते का जाणे
तुझी एक झलक पाहाण्यासाठी
डोळे मात्र झुरत होते...

ख़रच ...... हिला वेड लागलय

ख़रच ...... हिला वेड लागलय ( kharach hila ved lagalay ) 
दूर कुठे तरी हरवल्यासारखी बघते,
हळूच गालातल्या गालात हसते,
नकळतच स्वता:तच गुंतते,
अन त्याचाच विचार करत क्षितिजापार पाहते,
ख़रच ...... हिला वेड लागलय ....
तो नसतानाही त्याच्याबरोबर बोलते,
अन तो समोर नसतानाही त्यालाच ही पाहते,
कुनाशिही बोलताना ह्याचाच विषय असतो,
रात्रंदिन हिच्या स्वप्नात तोच एक राहतो,
ख़रच ...... हिला वेड लागलय ....
ती स्वतःचा नाही त्याचाच विचार करते,
देवाकडे स्वतःच नाही त्याच सुख मागते,
तो समोर असला की त्याच्याशी बोलताच नाही,
सांगा बर, ही न बोलन्याच सोंग घेते की नाही?
ख़रच ....... हिला वेड लागलय ....

आवडतो का तो विचारल्यावर लाडिक हसते,
माहित नाही म्हणुन विषय बदल म्हणते,
गालावरची लाजेची रक्तिमा लपवशील कशी?
त्याच्यावरती प्रेम आहे हे त्याला सांगशील कधी?
ख़रच ....... हिला वेड लागलय ...

तू अशीच आहेस,

तू अशीच आहेस,
एकटी एकटी जगनारी.....
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरनारी.....

तू अशीच आहेस,
खुप प्रेमाने बोलणारी
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारी .....

तू अशीच आहेस ,
जीवानाच मर्म जाणनारी..
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म माननारी....

तू अशीच आहेस,
एकटी एकटी जगनारी.....
सर्वात असाताना देखील,
स्वतःहाच्या शोधात फिरनारी.....

तू अशीच आहेस,
खुप प्रेमाने बोलणारी
आपल्या सरळ वागण्याणे ,
कुणालाही सहज आपलसं करणारी .....

तू अशीच आहेस ,
जीवानाच मर्म जाणनारी..
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,
आपला धर्म माननारी....

तू अशीच आहेस,
दुखाःतही नेहमी हासनारी....
अन हसत हसता
नियतीला लाजवनारी ...

तू अशीच आहेस,
इतरांना सतत प्रकश वाटणारी ....
पण स्वतःहा मात्र,
काळोखात आटनारी ......

तू अशीच आहेस,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारी .
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन रहणारी ........

दुखाःतही नेहमी हासनारी....
अन हसत हसता
नियतीला लाजवनारी ...

तू अशीच आहेस,
इतरांना सतत प्रकश वाटणारी ....
पण स्वतःहा मात्र,
काळोखात आटनारी ......

तू अशीच आहेस,
सगळ्यांपासुन दुर दुर जाणारी .
जाताना मात्र सगळ्यांच्या मनात
घर एक करुन रहणारी ........ MISSING U

कॉलेज ला कधी जायचं नसतं

कॉलेज ला कधी जायचं नसतं


गेल्यावर मुलींशी कधी बोलायचं नसतं


बोललच तर प्रेमात पाडायच नसतं
...
पडलच तर घाबरून पलायच नसतं



आणि पलायच असेलच तर ...

तिलाही सोबत न्यायच असतं !!! :)

अशाच एका तळ्याकाठी बसली होतीस तू???

अशाच एका तळ्याकाठी बसली होतीस तू???
आठवणीत कोणाच्या रमली होतीस तू????

निळ्याभोर आकाशातील उनही तुला लाजले???
नको तुला त्याची झळ म्हणून मेघ पुन्हा वाजले???

तुझ्या नाजूक डोळ्यांची काय तुलना करू मी??
तुझ्या सोज्वळ हास्याची काय कल्पना करू मी??

नशिबात ज्याच्या असशिल तू………….
सुख आणि सुखच त्याला देशील तू…….

ओठावर नाही शब्द माझ्या……………
वीसावली कविता माझी तारुण्यावर तुझ्या…

तू ही चक्क त्या पावसासारखीच...........

हळूच येतेस,आणि तुला वाटेल तेव्हा निघून जातेस,
कधीतरी तुझी वाट पाहायला लावतेस,
आणि कधीतरी माझ्या आधीच तिथे पोहचतेस,
खरच तू ही चक्क पावसा सारखीच..............

कधीतरी तुझ्या रेशमी केसात,
फेसाळलेला धबधबा दिसतो,
तर कधी तुझ्या डोळ्यात कडाडती वीज,
कधीतरी तू खूप जवळ हवीशी वाटतेस,
तर कधीतरी तुझी खूप येते कीव.
खरच तू ही चक्क पावसासारखीच........

कशीही असलीस तरी
तू अशीच बरसत रहावीस क्षणोक्षण,
कधी ना तुटावे तुझे नि माझे रणानुबंध...
आयुष्यभर आपण ज्याची वाट पाहतो,
तो कधीतरी येतोच आपल्यापाशी.......
हाच तर तो पाउस, आणि तू ही चक्क त्या पावसासारखीच...........

अजुनही मी एकटाच........

तू होतीस तेव्हा पण, आता तू नाहीस तरी पण.....
राहिलो फक्त मी एकटाच??

हृदयात तुझी आठवण साठवत गेलो,आणि प्रेम मनापासून करत गेलो;
तू क्षणभर पण नजरेपासून दूर होत नाहीस,आणि तुझी वाट पाहत राहिलो;
फक्त मी एकटाच..........

स्वप्नात तुझ येणं-जाणं असायचं, आता तू स्वप्नात येणंही बंद केलस,
आता स्वप्नातही तुझी वाट पाहात राहिलो,
फक्त मी एकटाच..........

रोज सकाळची ती पावणे सहाची बस बाजूने जाताना तुला शोधायचो,
कधीतरी पुन्हा दिसशील या आशेने, रोज धावत जाउन तो स्टॉप गाठायचो;

आजही रोज बाजूने जाणार्या प्रत्येक बसमध्ये, तू दिसशील म्हणून मागे वळून पाहतो,
पण जेव्हा नजरा थांबतात, तेव्हा समजतं तू नाहीस तिथे,

उरतो फक्त मी एकटाच.........

व्यक्त झालेली मी...

तो  असेल  माझ्यासाठी 
मैत्रीचे  स्वस्तिक ,
प्रेमातील  नास्तिक  मी 
होऊन  जाईन  आस्तिक .
 

 कुठेतरी  कधीतरी  तुला
डोळे  भरून  पाहावंसं  वाटत.
पापण्या  मिटता  मिटता 
डोळ्यातला  पाणी  टचकन  खाली  येत .


  आयुष्य  कस  असत 
बाभळीच्या  पालवी  सारख  ,
काट्यातच   फुलणार 
अन  काट्यातच  विरणार.
आपल्याला  प्रेम  करता  येते
कोणताच  तेढ  न  ठेवता
मग  आपण  ते  व्यक्त  का  करत  नाही
कोणतेच  आढेवेढे  न  घेता ?


पावसासाठी  आम्ही  दोघे 

होतो  एकदम  वेडे ,
चिंब  आम्ही  होऊन  जातो
पडताच  नक्षत्रांचे  सडे .


हल्ली  मला  भावनांचा 

थांगच  लागत  नाही ,
क्षणभरही  मनाला   आता
उसंत  मिळत  नाही .

माहित  नाही  जगाच्या  लेखी

काय  अर्थाचा  आहे  शब्द  मन ,
माझ्यासाठी  त्याचा  अर्थ
समजून  घेणा  कण  नि  कण .


उगवत्या  सूर्याबरोबर  तेजस्वी  स्वप्न 
पाहतात ते    दोघ
रोज  नवे  क्षण  नवे  छंद
पडतात  त्यांना  मोह .


जीवनाचा   धागा  धरता  धरता 

मिळाला  प्रेमाचा  दोरखंड
कदाचित  म्हणूनच  आपलं  प्रेम
राहिला  अजरामर  अखंड .

ती तशीच राहू दे ना मला.

ती :

आता करायचच आहे कुणाशी तरी
तशी दोन-चार मुलही सांगून आली
कोणी बघितलाच असशील तर सांग त्याला
काल शेवटी आई पण बोलली

म्हटलं विचाराव तुला
तू आहेस का तयार
अजूनही आवडते तुला
का सोडलास विचार

मी :

धाड धाड धाड
ती फक्त बोलतच होती
सुटली तेव्हा अशी काही
थांबायचं नावच घेत नव्हती

शांतपणे मी सारे ऐकून घेतले तिचे
नंतर उगीच माझे मलाच हसू आले
खेळणे झाले कि राव, तुमचे हे असे
सगळेच आले आणि कसे खेळून गेले

तेव्हा नाकारले होतेस, जोरात हसून
मी पहिलेच नाही तुला, त्या नजरेतून
दुसरी चांगली मिळेल, मला जा विसरून
मग थट्टा केलीस माझी, चार चौघींना सांगून

मी मात्र वेडा तुझ्यावर प्रेम करणारा
झिडकारलेस तरी तुला दुरूनच पाहणारा
त्याग म्हणजे खर प्रेम सगळ्यांकडून ऐकणारा
सुखी रहा म्हणत तुझे स्वप्न रोज जगणारा

का वागलीस तेव्हा अशी ... माहित नाही
काय आता मनात तुझ्या ... काही कळत नाही
काय हवय मलाही ... काही उमजत नाही
बायको म्हणून भेटशील पण प्रेम .... माहित नाही

करायचच आहे कुणाशी तरी
मग कोणीही भेटेल कि तुला
मी जिच्यावर प्रेम केल
ती तशीच राहू दे ना मला

......

की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?

नेहमी तिचाच विचार, नेहमी तिचीच आठवण
का एका मैत्रिणी साठी मी इतके झुरतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?


चार चौघात मित्र मला तिच्या नावाने चिडवतो ...
का त्याचा प्रयत्न फसतो कारण खरतर मनात मी हसतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?

'परदेशी चाललास पण मला विसरु नको'
का तो तिचा शेवटचा SMS मी परत परत वाचतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?

तू परत कधी येणार? ती रोज रोज विचारते :(
का 'नक्की नाही' म्हणताना माझा आवाज खालावतो...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?

तिला एक स्थळ आले, कोणी तिला पाहून गेला
का तिने त्याचे नाव घेता मी विषय बदलतो
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?


हे प्रेम नाही मैत्रीच आहे, एकच उत्तर नेहमी
पण का ते खरे की खोटे असा प्रश्न मला पडतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?

काय सांगू मी तुम्हाला मला online प्रेम झाल

काय सांगू मी तुम्हाला


काय सांगू मी तुम्हाला मला online प्रेम झाल,
हृदयातील मन माझं facebook वरती आल.


तोंडाने भावना व्यक्त करायचो ते आता विसरले,
सारे शब्द जणू key board वरती घसरले,

मी म्हटले मनाला चल थोडा वेळ जाऊ,
मन म्हणाले मला, ती येते का ते पाहू.

तू गेलास कि माझे शब्द तिथे कोण पोहोचवेल,
अन मी नसलो इथे, तर तुला कोण सुचवेल.

आपण एक काम करू एकत्रच राहू,
ती येण्याची वाट दोघ आतुरतेने पाहू.

५ होते वाजले ती येण्याची झाली वेळ,
मन म्हणाले मला बंद कर तो पत्त्यांचा खेळ.

ती आली, मला म्हणाली आहेस का रे विशाल,
मन म्हणाले मी तुझी वाट पाहतोय खुशाल.


ती म्हणाली हाई, कसा आहेस, आता तू बोल,
मी म्हणालो मनाला आता तूच टाक झोल.

खूप वेळ झाला अन भरपूर मारल्या गप्पा,
मन तिथेच होते पुढे जायीनाच टप्पा.

मन म्हणाले मला तीला भेटायला सांग जरा,
मी म्हणालो आत्ता नको वेळ येऊन देत बरा.

ती म्हणाली मला बाय, वाजले आहेत आठ,
मन म्हणाले मला तू का करतोस असा थाट


असंच रोज आमचं ( माझं आणि माझ्या मनाचं) भांडण होत राहिलं,
खर सांगा मित्रांनो तुम्ही कधी online प्रेम पाहिलं ?

आली तुझी आठवण

बसलो होतो एकांतात आली तुझी आठवण,
अजून एका कवितेची झाली मनात साठवण.


हरवून गेलो मी ही, हरपले सारे भान,
आता बरीच खोल झाली माझ्या कवितेची खाण.

 का गेलीस तू मला एकटे इथेच सांडून,
आजपर्यंत वाट पाहतोय बसलोय खेळ मांडून.


मनात तू असलीस तरी का आहे दुरावा,
पाणी होऊन डोळ्यात तो असा का उरावा.

 पाऊस पडला कि वाटत मनापासून भिजावं,
तुझ माझं गोड नात पुन्हा एकदा रुजावं.

 तू बोलत असतेस तेव्हा मन वेड्या सारख पळत,
अन निघून गेल्यावर मात्र वणव्या सारख जळत.


तुझ्या माझ्या प्रेमाची भिंत आहे पडलेली,
त्यातच तर खरी आहे आशा नवी दडलेली.


तुझी माझी प्रीत ती माहित आहे ढगाला,
माझं तुझ्यावर प्रेम आहे ओरडून सांगेन जगाला.


तू झालीस दुसरयाची ते मी आहे जाणतो,
तरी तुझ्या आठवणींचे अश्रू डोळ्यात आणतो.


कधी काय कळलेच नाही झालो तुझ्यात मग्न,
सांगायचे तुला राहूनच गेले अन झाले तुझे लग्न.


दूर कुठे तरी हरवल्यासारखी बघते,

दूर कुठे तरी हरवल्यासारखी बघते,
हळूच गालातल्या गालात हसते,
नकळतच स्वता:तच गुंतते,
अन त्याचाच विचार करत क्षितिजापार पाहते,
ख़रच ...... हिला वेड लागलय ....
तो नसतानाही त्याच्याबरोबर बोलते,
अन तो समोर नसतानाही त्यालाच ही पाहते,
कुनाशिही बोलताना ह्याचाच विषय असतो,
रात्रंदिन हिच्या स्वप्नात तोच एक राहतो,
ख़रच ...... हिला वेड लागलय ....
ती स्वतःचा नाही त्याचाच विचार करते,
देवाकडे स्वतःच नाही त्याच सुख मागते,
तो समोर असला की त्याच्याशी बोलताच नाही,
सांगा बर, ही न बोलन्याच सोंग घेते की नाही?
ख़रच ....... हिला वेड लागलय ....

आवडतो का तो विचारल्यावर लाडिक हसते,
माहित नाही म्हणुन विषय बदल म्हणते,
गालावरची लाजेची रक्तिमा लपवशील कशी?
त्याच्यावरती प्रेम आहे हे त्याला सांगशील कधी?
ख़रच ....... हिला वेड लागलय ...