प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी चश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी, चारचौघीत उठून दिसणारी असावी ग़ालिबाची शेर -ए-गझल नसली तरी, माझी एक छानशी चारोळी असावी यश-राज पिक्चरची हिरॉईन नसली तरी, पण घराला घरपण देणारी नाईका असावी बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी, पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी हाय... हेलो... नया दौर असला तरी नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी ड्रीम-गर्ल नसे ना ...पण मनाने सुंदर असावी नात्यांच्या नाजुक धाग्यांना हळुवार जपणारी असावी ओळख असून सुद्धा अनोळखी वाटत राहावी तिला ओळखण्याची दिनरात माझी धडपड चालावी केव्हातरी कुठेतरी ती भरभरून व्यक्त होणारी असावी मनाचे गुपित मग डोळ्यांनीच सांगणारी असावी थोडी खट्टी...थोडी मिठी असावी तिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी हसताना गोबऱ्या गालावर नाजुक खळी पडावी त्या खळीत सदा पाडण्याची मग माझी रीतच व्हावी इवल्याश्या नाकावर राग घेऊन वाट पाहणारी असावी मी उशीर केला तर मग माझ्यात मिठीत रडणारी असावी चोरून चोरून भेटायला येणारी असावी हातात हात घालून मग सगळ्यांसमोर फिरणारी असावी तिच्यासोबत आयुष्य ही एक वेगळीच बात असवी सुख आणि दुःखात सदा दोघांची साथ असावी जितकी कोमल तितकीच कठोर वागणारी असावी माझ्या नकळत माझे आयुष्य फुलवणारी असावी आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी भग्न स्वप्नांच्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी, एकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी
अशी असावी ती

प्रेयसी माझी, एम.बी.बी.एसआहे
तिला म्हणालो,मला आज काल झोप येत नाही
काय करु, तुझी आठवण मला झोपूच देत नाही
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली
झोपेची गोळीकाढून,माझ्या हातावरती दिली.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एसआहे.
मी म्हणालो, माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे.
ती म्हणाली,धीरधर अजुन थोडासाच उशीर आहे.
उद्या आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्त तपासणी शिबीर आहे.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.
मी म्हणालो, तुझ्यासाठी काहीही करु शकतो.
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो.
त्या क्षणी ती उठली,आणिआत निघून गेली.
माघारी येताना हाती "डिसेक्शनबोक्स" घेवून आली.
..... मित्रांनो अशीही, माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.
एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली.
तिने तिची ओढणी,माझ्या पायावरती बांधली.
नजरेस नजर मिळवून माझ्या,हळूचती म्हणाली.
पडलास तू,पण जखम माझ्या काळजावरती झाली.
.......... तर माझी हीकेस अशी आहे.
एक एम.बी.बी.एस. माझी प्रेयसी आहे.
मन हे चंचल, मन हे निर्मल
तू रोज रोज नाही बोललास तरी काही हरकत नाही
पण तुझे माझी नजर टाळून जाणे,
मी कधीच सहन करू शकत नाही...
मला का समजत नाही तुझे मन...,
मी का ओळखत नाही आपले ॠणानुबन्धन..
पण खरच गरज आहे का,
त्या नात्याच्या चौकटीची...
अन कुठल्याही कबुलीची...??
आणि खरच का गरज आहे,
जगाला ओरडून सान्गण्याची..?
आणि सारे काही फ़क्त फ़क्त माझ्यापासून लपविण्याची..??
ह्या दोघान्चीही गरज नाही आहे रे सख्या...
गरज आहे ती फ़क्त निखळ सत्य स्वीकारण्याची...
तुझ्या आणि माझ्या मनातलया त्या प्रेमाच्या ग्वाहीची...
अपेक्षा आहे ती फक्त प्रेमासाठी प्रेम करण्याची !!
तू मलाच चुकीचं ठरवल
एक मैत्रीण
एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल
एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल |
एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल , |
तिला पाहताच त्याला तीच वेड लागल , |
वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल, |
पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल, |
वेळ मात्र आपली हसत ,खेळत राहत होती, |
ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती , |
काही दिवसाने वेळ मात्र जमिनीवर पसरू लागली , |
ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली , |
वेळ म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे , |
तू मला आधार देशील का ?? |
यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का |
ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली , |
ते पाहून झाडाची निराशा झाली , |
हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले , |
विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले , |
वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली , |
अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली , |
आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला , |
कारन …. तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला .. |
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!
आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा
कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ
पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्यापाशी
तळं होऊन साचायचं!
आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील
ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे
असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!
म्हणून...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!