marathi zakkas jokes


नवरा - तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.

बायको - मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?

नवरा - तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा :P 

----------------------------------------------------------------------

स्मार्ट मुलगा + स्मार्ट मुलगी = रोमान्स

स्मार्ट मुलगा + ढ मुलगी = लफडं

ढ मुलगा + स्मार्ट मुलगी = लग्न

ढ मुलगा + ढ मुलगी = विवाहपूर्व 'संकट

 -----------------------------------------------------------------
बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता.


चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.

चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, 'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'

 ----------------------------------------------------------------------------------
एकदा सांताला  त्याच्या गर्लफ्रेण्डचा एसएमएस आला.

' आय मिस यू!'

  सांताने खूप विचार करून त्याला उत्तर लिहिले,

' आय मिस्टर यू!!'


-----------------------------------------------------------------------------------------

बायको : काय हो...इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?

नवरा : बहिणीशी

बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?

नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय.

 ----------------------------------------------------------------------------------------
झंप्या   : डॉक्टर, माझ्या कानात सतत गुणगुण ऐकू येते.

डॉक्टर : असं कधी होतं तुम्हाला?

झंप्या : वॉकमन लावल्यावर!

 -------------------------------------------------------------------------------

शिरप्याचं गाढव हरवलं. तरीही तो देवाला धन्यवाद देऊ लागला.

गणा : काय रं शिरप्या, तुझं गाढव हरवलं आनि तरी बी तू देवाचे आभार मानतुयंस?

शिरप्या : आरं बाबा, देवाचीच किरपा की मी त्या गाढवावर बसलो नव्हतो, न्हाय तर मी बी हरवलो असतो की.

 -------------------------------------------------------------------------------
पती : तू आणि फक्त तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस?

पत्नी : कसं काय?

पती : माहेरी जाऊन!!

 -------------------------------------------------------------------------------
न्यूटनचा मृत्यू कसा झाला???
.
.
.
.
.
त्याने रजनीकांतचे पिक्चर बघितले आणि आपण स्वत: तयार केलेल्या नियमांची वाट लागताना बघून त्याला धक्का बसला :D :D


------------------------------------------------------------------------------------
बांता  : अरे, या टीव्हीवाल्यांना कसं काय कळतं?


सांता  : काय कळतं?

बांता  : की, आप देख रहे है 'स्टार प्लस'?

 ----------------------------------------------------------------------------------------
गर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललोय?

बॉयफ्रेण्ड : लाँग ड्राइव्हवर!

गर्लफ्रेण्ड : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?

बॉयफ्रेण्ड : मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!!
----------------------------------------------------------------------------------
अभिषेक बच्चन :तुला माहित आहे का माझ तुझ्यावर किती प्रेम आहे ते ?
ऐश :- No idea.
अभिषेक:  Get idea
.
.
.
ऐश :गप्प माकडा :D :D :D

lai bhari jokes


मुंबईतला किस्सा ...मंगळवारची सकाळ ..पप्प्या taxi वाल्याला विचारतो..सिद्धीविनायाकला जाणार का ? ..ड्रायवर : हो जाणार कि ........पप्या म्हणतो ......." मग ठीक आहे ...जावा पण परत येताना माझ्या साठी प्रसाद घेऊन या"

नवीन जन्माला आलेल्या बाळाला(नवजात अर्भक :P) नर्स विचारते, "बाळा तू
नाश्त्याला काय घेणार ? पोहे की साबुदाण्याची खिचडी ?? ".....................बाळ
म्हणत, " च्यायला, परत पुण्यात च आलो वाटतं !!
 पुणेरी किस्सा : एक मुलगा कर्वे रोडवरून प्रचंड जोरात गाडी चालवत होता....एक माणूस त्याला म्हणतो ..."काय कर्वे??".....तो मुलगा गाडी स्लोव करून म्हणतो.." माझे आडनाव कर्वे नाहीये ..." तो माणूस : " मग बापाचा रस्ता असल्यासारखा गाडी का चालवतोस ??????"

गुरुजी स्पेशल: एकदा दोन गुरुजी गप्पा मारत बसलेले असतात........ पहिले: मला टाटा आणि बिर्ला या दोघांची मालमत्ता मिळाली तर मी त्यांच्यापेक्षा जास्त पैसा कमावेन !!.......दुसरे: कशाला उगाच फुशारक्या मारता, ते कसं शक्य आहे ?? ...........पहिले: का नाही ? सकाळ-संध्याकाळ दोन शिकवण्यासुद्धा घेईन ना !! :D :D

पप्या : ए गण्या तुला पोहता येतं का ? गण्या : नाही रे ....पप्या : शी तुझ्या पेक्षा तो कुत्रा बरा...त्याला तरी पोहता येते..गण्या : तुला पोहता येतं का ? ...पप्या : हो मग .... गण्या : ई अरे .......मग त्या कुत्र्यात आणि तुझ्यात काय फरक ? .

एकदा एका शाळेवरून विमान चाललेले असते.........पण ते अचानक आहे त्या जागीच थांबते. ......ना पुढे जात....ना इकडे तिकडे....guess why ????? ........कारण शाळेमध्ये जन-गण-मन- चालू झालेले असते.......

एक छोटीशी प्रेम कथा

होता एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करायचा...म्...हणतात ना शोदनार्याला देव हि मिळतो...........तसेच ह्याने तिला शोधले होते. तीन वर्षाच्या प्रयात्ना नंतर ह्याने तिला मिळवलं होत..दोगेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे...तीच जरा जास्तच होत.पण काय करणार दोघांची हि भेट होण शक्य न्हवती.कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला..फोन वर बोलन तसे दररोजचेच.पण भेट फक्त सहा महिन्याने होत असे.........

पण एक दिवस पूर्ण नूरच पालाडतो....ह्याला अचानक रक्ताच्या उलट्या होतात..ह्याला डॉक्टर कडून समजत कि मला कर्क रोग झालाय.आणि माज्या हातात फक्त सहा महिने उरले आहेत.हा तिला समजू देत नाही....कारण सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस असतो....आणि तिच्या वाढदिवशी ह्याला तिला पहायचे असते...
...
तिच्या वाढदिवसाला चार दिवस बाकी असतात..आणि ह्याला कळून चुकलेले असते कि आपली वेळ जवळ आलीय ..हा मनात विचार करतो कि हिच्या वाढदिवशी आपण हिला शेवटच पहायचं आणि मगच आपण आपले प्राण सोडायचे...सतत चार दिवस हा तिला त्याच ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी ह्यांची पहिली भेट झाली होती...तिच्या कॉलेज मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी जाऊ असे त्याला सांगते...हा तिला शेवटच विचारतो कि तुला यायचं आहे कि नाही...कसलाही न विचार करता ती त्याला नाही सांगते...

वाढदिवसाचा दिवस उजाडतो....ह्याची वेळ जवळ आलेली असते ह्याच्याकडे फक्त तीन मिनिटे असतात...हा तिला फोन करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो...हि त्याला विचारते काय करतोयस.........आणि हा शेवटी एवड्च म्हणतो....

आज मी मृत्युच्या दारी उभा आहे ग........................मरता मरता तुला तुझ्या वाढदिवशी शेवटच पहायची मनापासून खूप इच्छा होती ग...पण तुही नाही म्हणालीस...........जाता जाता तुझ्या मिठी मध्ये यायचं होत पण तुला भेटायचे न्हवत...................तेव्हा तर नाही पण मला मेल्यावर तरी मिठी मध्ये घेशील ना?????हि विचारते काय झाल आणि फोन कट होतो............हि त्याच्या घरी येते पण वेळ निघून गेलेली असते......तिला त्याच्या आईकडून समजत.......हि जेव्हा त्याला आपल्या मिठी मध्ये घेऊन रडत असते तेव्हा त्याचा डावा हात खाली पडतो..त्याच्या हातावर लिहिलेलं असत कि.................

ए जाणू नको रडूस ग...
कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले .मला माफ कर..............................

ह्यांनी ज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलं असत त्याच ठिकाणी हि प्रेम वेडी आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पाहत असते...फक्त ह्याच आशेने कि तो कुणाच्या तरी रुपात येईल आणि तिला मिठीत घेईल...पण म्हणतात ना

(डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो.पण माथ्या आड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही........: --

स्वप्न

स्वप्न  संपल की सत्य बोचु लागतं उदबत्या जळुन गेल्या तर मागे राखेचा सडा ऊरतो . राखेला सुंगंध नसतो. स्वप्नाला सुत्र  नसत. तरी मी त्याला विचारलं "स्वप्नांवर माणुस जगतो का रे ?" तो म्हणाला "नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो, रमतो. पण जाग येईपर्यंत ! जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर "

"मी बुवा स्वप्नांवरच जगतो. स्वप्नांचा आणि सुंगंधाचा फ़ार जवळचा संबंध असतो"
"बरोबर आहे, शेवटी दोन्हीची राख होते"

व. पु. प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारी


भक्तीभाव...असामान्य असं काही नसतं. ज्याला जसं परवडेल तसा तो राहतो. 
पूजेसाठी कुणी फुलं घेतो, कुणी सुवर्ण घेतो. 
स्वत:च्या कुवतीप्रमाणे जो तो साधनं निवडतो.
ती गौण नसतातच . ती नाममात्र असतात. 
प्रश्न असतो भक्तीभावाचा! शंभर वर्ष तप करून शंकराला एकेक शीर
अर्पण करणारा लंकाधिपती असतो, 
तर तुळशीच्या पाणावर दैवताला जिंकणारेही असतात

सौंदर्य...
'स्त्री? ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं,
'तुला बुद्धी हवी का सौंदर्य??
तेंव्हा ती स्त्री म्हणाली,
'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे!?
'का??
'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, 
पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.? 

ज्योत...
?ज्योत? म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं.
सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. 
कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून? 
आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, 
झंझावातालाही असतं. 


स्वाभाविक....
त्यांनी बघावं म्हणून मी इथं येत नाही. इट् इज अ पार्ट ऑफ द् गेम! पुरूष पाहणारच.
स्वाभाविक गोष्टींवर् चिड्ण्यात अर्थच नसतो. 
भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही, अणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करत नाही. 
फुलणं हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारानी, रसिकांनी कमळाकडे पहावं, भुंग्याकडे पहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं. 



जबाबदारी...
?जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक सांगाल??
"ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधीकधी दहा-बारा हजारांचा एखादा
दागिना सांभाळायचा असतॊ. ते इतरांनाही माहित नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी.."
"प्रेम, मैत्री, संगोपण, शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदारया. 
त्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली."

"ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?"

"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते. 
ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं." 






पार्टनर
पोरगी म्हणजे झुळुक! अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही.

आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणुस न जाणं हाच नरक.

तुला मी हाक कशी मारु? पार्टनर ह्याच नावाने.
आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं.

लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणुन मला तू हवा आहेस.

कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.

दु:खं, आनंद, जय, पराजय, हसु, आसु, जन्म, मरण, विरह-मिलन, सगळं तसच असतं .प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं, एवढच काय ते नविन. पुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हेच मरण.

समुद्राची ताकद टिटवीला समजत नाही.
आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही.
सुगंधाचं कोडं फ़ुलाला उमलत नाही.
एवढासा तू, त्याहुन एवढासा मी मला जिवनाचा अर्थ कसला विचारतोस?आणी त्याहीपेक्षा संभोगाचा अर्थ लावायचा असतो, हे तुला कोणी सांगितले?
पाणी म्हणजे एच टू ओ.इथचं सगळे थांबलेले आहेत.मुर्ख म्हणुन नव्हे तर जाणकार म्हणुन थांबले.
पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणुन.
कोणता आनंद क्षणजीवी नाही?
दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर चव. खाली उतरला की घास.
सुगंधाचं नातं नाकाशी.घशातुन आत गेल्यावर ति फ़क्त हवा.
खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं नातं रसिकतेशी नसुन तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की रसीकता संपली.
इतर अनेक गरजांप्रमाणे "तृप्ती" जी एक गरज आहे.
जो गरजु आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो.व्यवहार नेहमी साधतोच असं नाही.तो सत्यासारखा कटू असतो.
ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटूता निर्माण होते.
सध्या एकच वर्तमान्काळ सांभाळ. 


निर्णय घेता न येन ह्यासरखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेता येण्या पेक्षा चुकीचा निर्णय घेणे अधिक बरे. चुकीचा निर्णय घेनारया मानासनी जीवनात यश मिलावलेले आहें. परन्तु जो निर्णय घेवु शकत नाही त्याचे मन हे करू की ते करू ह्या गोंधलात घुन्तलेले असते. मात्र हा मनुष्य कधीही यशस्वी ज़ल्याचे ऐकिवीत नाही. त्याला कृति करता येत नाही आणि ज्याला कृति करता येत नाही त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिलवता येत नाही. 
-व पु 


चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जितकं प्रखर, तितकं सौम्य. चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!
माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.
ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती?
उपवास करणार्यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल.
पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार?
त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे.
समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात. 




एक मांजर सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळं मांजराला स्वत:ची लांबपर्यंत पसरलेली सावली दिसली. मांजर म्हणालं,'आज कमीत कमी एखादा घोडा मारून खाल्ल्याशिवाय भूक भागायची नाही.'सूर्य वरवर येऊ लागला.सावलीकडे पाहून मांजर म्हणालं,'घोड्याची काही जरूरी नाही. एखादी शेळी सुद्धा चालेल.'सूर्य आणखी वर आला. सावलीची लांबीही त्याप्रमाणात कमी झाली.मग मांजर म्हणालं,'एखादा ससाही चालेल.'ऐन दुपारी सावली पायांतळीच आली. तेंव्हा मांजर व्याकूळ होत म्हणालं,'फक्त एक उंदराचं पिल्लू पुरे.'

व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेंव्हा ते 'पूर्णत्व'. 

व. पु. ची काही वाक्ये

प्रत्येक माणूस हे एक कोड आणि प्रत्येक माणूस एकदाच हे आणखी एक कोड
- आपण सारे अर्जुन 


आम्ही 'सहन करतो, सहन करतो', हे इतका वेळ तुम्ही सांगीतलेत...
ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाही. तुम्ही दु:ख वाटत सुटलात. 
जो सहन करतो, तो बोलत नाही...... 


Success is a relative term. More success, more relatives. 


चांगुलपणाच्या कृतीचं, कृती संपताक्षणीच विस्मरण व्हावं. कापूर जळतो, तशा त्या आठवणी जलून जाव्यात....
कापूर जळला की, राखेच्या रुपाने ही त्याचं अस्तित्व रहात नाही. त्याप्रमाने सत्कृत्याच्या आठवणीचं पुढच्याच क्षणी विस्मरण व्हावं. 


"आम्ही कोरडे पाषाण असतो म्हणुनच आम्ही रडवू शकतो. ज्याला दगड लागतो, ठेच लागते तो विव्हळतो. ज्याच्यामुले ठेच लागली त्या दगडाला पाझर फुटल्याचं कधी पाहिलंस का..????" 


कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....... पण गगन भरारीच वेड रक्तातच असाव लागत.... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही ! 


आकाशात जेंव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेंव्हा गुरूत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पीटाळून लावे पर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वता गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो. 

असच माणसाच आहे... 
समाजात विशिष्ट उंची गाठे पर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. 


प्रयत्नात ढिलेपणा नको
कष्ट करतांना सवलत नको 
महत्वकांक्षेला मर्यादा नको
आणि
आपल्याइतक्याच पॊटतिड्केन दुसरी व्यक्ती
आपल काम करेल ही भ्रांत नको
प्रयत्न करत असतांना निर्णय घेणारी आणखी एक
शक्ति आहे, ह्याच भान ठेवाव.आपण प्रयत्नात ढिलाई केली नाहि
हे समाधान कोणीही हिरावुन घेउ शकत नाहि. 



यश म्हणजे ताटाभोवती ची रांगोळी.सतत अस्तित्व दर्शवणारी.रांगोळीचा भुकेशी संबंध नाही.म्हणुनच ती पचवण्याचा प्रश्न उदभवत नाही. अपयश हे वाढलेल्या ताटासारख.अन्नावर वासना नसली तरी ते वाढ्ण गिळाव लागत, पचवाव लागत. चेहरयाची रंगोळी विस्कटु न देता. 



माणसाने मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यावर परिणाम होतो. 


पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो तेवा काही वाटत नहीं ..
तो अंगावरच सुकतो तेव्हा त्याचंही काही वाटत नाही..
सुकला नाही तरी ओल्याची सवय होते..
पण म्हणुन कुणी ओलाच शर्ट अंगात घाल म्हटलं तर कसा वाटतं?? 

तप्तपदी व.पु.काळे

"आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो,की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे,अशा क्षणी कुणावरही विसंबुन रहायचं नाही.आपला बेत फ़सला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही.निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे."

"लग्नासारखा एक निर्णय आबाद किंवा बरबाद करायला पुरेसा असतो.अशा वेळी व्यक्ती स्वतंत्र हवी."

"समस्या आणि उत्तर ह्यात वेळ म्हणजे Time Factor असतो.Forth Dimension म्हणतात तो Factor.म्हणुनच एका उत्तराची वेळ टळली की दुसरं उत्तर शोधावचं लागतं."

"उत्तम आणि उच्च पदवी हीसुद्धा ऎपतच आहे.नुसत स्वाभिमान आहे,पण कोणतीच पात्रता नाही ती माणसं जास्तीत जास्त मग्रुर असतात."

"एखादी व्यक्ती जाता-जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेला कॉमेंट करते.तेव्हा त्यांच फ़क्त नवल वाटतं.पण केव्हातरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडुन बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात.पृष्ठभागावरुन नुसतचं वाहुन गेलेलं पाणी किती आणि जमिनीने धरुन ठेवलेलं किती हे ’बोअरवेल’ खणल्याशिवाय कळत नाही.वर्ष संपलं की आपण नवीन Calender आणतो.काही वाणसामानाबरोबर फ़ुकट येतात.कधीकधी Calender साठी आपण अनावश्यक वस्तुही घेतो.प्रत्येक महीन्याला वेगवेगळं चित्र असलेलं,कधी जाहीरपणे लावता न येणारं किंवा लावता येणारं,भारी Calender ही आपण पळवलेलं असतं.कितीही आकर्षक -आकर्षक म्हटलं तरी त्याच नाविन्य किती काळ?
नाविण्याइअतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तु नसेल.भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकामटेकड्यांना Calender वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.तो पट जेव्हा जेव्हा उलगडला जातो तेव्हाच समोरच्या माणसाला जाणवतं की,प्रत्येक श्वासाचं दाम मोजुन श्याम विकत घेणारी गदिमांची नायिका आणि समोरचा माणुस एकच आहे.बुद्धी,मन आणि शरीराच दान करुन ह्या माणसाने Calender चा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे."

kapus joke

कापूस
डोक्टर कडे फोन ची बेल वाजते पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का? 
डोक्टर: हो आहे की. 
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा. 
परत १० मी. फोन येतो. 
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का? 
डोक्टर: हो आहे की. 
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा. 
अस ३ ते ४ वेळा झाल्यावर डोक्टर फ़ार चिडतो.. मनात म्हणतो आता येवू देत फोन 
बघतोच त्याच्याकडे. 
१० मी. पुन्हा बेल वाजते… 
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का? 
डोक्टर: जोरात ओरडतो.. नाहीये का? 
पलीकडचा माणूस : आहो मग चिडता कशाला खिशातला काढा की। 
हा हा हा हा !!!! 

driver traffic police joke

ट्रॅफिक पोलिसांनी कार थांबवली. 'अभिनंदन, रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू
आहे... तुम्ही सीटबेल्ट लावून गाडी चालवत आहात, म्हणून तुम्हाला ५०००
रु.चं बक्षिस मिळतंय.
या रकमेचं तुम्ही काय कराल?'
कार ड्रायव्हर: मी त्यातून माझं ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेईन.
ड्रायव्हरची आई (मागच्या सीटवरून): त्याचं काही एक ऐकू नका.. दारू पिऊन
तो काय वाट्टेल ते बोलतो...
ड्रायव्हरचे बाबा: मला वाटलंच होतं... चोरीच्या गाडीतून आपण जास्त लांब
जाऊ शकणार नाही...
तेवढ्यात डिकीतून आवाज आला: भाई, आपण बॉर्डर पार केली का???

पुरंदर किल्ला

पुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
 
नाव : पुरंदर
उंची : १५०० मी.
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : सोपी
ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव :  सासवड
डोंगररांग : पुणे

सध्याची अवस्था
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्‌ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.

पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.

इतिहास

पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे 'इंद्रनील पर्वत'. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्‍या बुरूज बंधाताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला.

इ. स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १२ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.

बिनी दरवाजा: पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकर्‍याच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते. त्याचे नाव 'पुरंदरेश्वर'.
पुरंदरेश्वर मंदिर: हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपंती धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
रामेश्वर मंदिर: पुरंदेश्वर मंदिराच्या मागील कोपर्‍यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशवांच्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथने तो वाडा बांधला होता. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच दिल्ली दरवाजापाशी येतो.
दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात.
खंदकडा: दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खंदकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखान्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेने गेल्यावर केदार दरवाजा लागतो.
पद्मावती तळे: मुरारबजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
शेंदर्‍या बुरूज: पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे. त्याचे नाव शेंदर्‍या बुरूज.
केदारेश्‍वर: केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायर्‍या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्‍वर मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्‍वर. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्‍वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्‍वर, रोहिडा, मल्हारगड, कर्‍हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
पुरंदर माची: आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणार्‍या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरावखिंडीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात.
भैरवगड: याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.
वीर मुरारबाजी: बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ. स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे.
गडावर जाण्याच्या वाटा

पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.

सासवडहून: सासवडहून सासवड - भोर गाडी पकडावी. या गाडीने नारायणपूर गावाच्या पुढे असणार्‍या 'पुरंदर घाटमाथा' या थांब्यावर उतरावे. हा घाटमाथा म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणारा सूर्यपर्वत यामधील खिंड होय. या थांब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते. ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो.
पुण्याहून: पुण्याहून ३० कि. मी. अंतरावर असणार्‍या सासवड या गावी यावे. सासवड ते नारायणपूर ही अशी एस्. टी. सेवा देखील आहे. नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडीरस्ता थेट किल्ल्यापर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडीरस्ता. या रस्त्याने चालतचालत गड गाठण्यास २ तास पुरतात. तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एक तासात आपण पुरंदर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहोचतो.
 राहण्याची सोय

किल्ल्यावर मिलिटरीचे बंगले आहेत. यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी तेथे असणार्‍या त्यांच्या ऑफिसरची परवानगी घेणे आवश्यक आहे.
जेवण्याची सोय

जेवण्याची सोय स्वतः करावी. पिण्याचे पाणी मात्र बारमाही उपलब्ध आहे.



नेताजी पालकर

 नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुले त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले.मुघलान्नी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधि पर पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांची ही चाकरी केली होती.

पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.
शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि।१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई हे नेताजी नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे.'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.

netaji palakar maratha warriar

नेताजी पालकर

 नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुले त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले.मुघलान्नी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधि पर पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांची ही चाकरी केली होती.

पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.
शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि।१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई हे नेताजी नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे.'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.

Ashi Hi Banwa Banwi (1988)


sambhaji maharaj maratha history

लहानपण
maratha sambhaji maharaj
संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
तारूण्य आणि राजकारण्यांशी मतभेद
१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. महाराजांचे अमात्य संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.
सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढय शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.
शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकर्‍यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील
मोगल सरदार

या सगळ्या घडामोडींमुळे संभाजीराजे अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यांना पुढे करून दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळाने किल्ला नेटाने लढवला पण शत्रुपक्षात युवराज संभाजीराजे आहेत हे कळताच शरणागती पत्करली. संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी दिलेरखानाकडे केली. पण विजयोन्मादाने हर्षभरित झालेल्या दिलेरखानाने ७०० मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना त्याचा भयंकर संताप आला. त्यानंतर दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या अत्याचारांचा जाब विचारला. पण दिलेरखानाने त्यांना जुमानले नाही. संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे स्वराज्यातील पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष दूर होते.
संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यांची पन्हाळगडावर भेट घेतली. त्यांनी संभाजीराजांना शिक्षा केली नाही. संभाजीराजांची त्यांनी स्वतः समजूत काढली. मात्र संभाजीराजांच्या स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकर्‍यांमधील दरी अजूनच रूंदावली. सोयराबाईंनी संभाजीराजांना राजारामच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. शिवाजी महाराजांचे राजारामच्या विवाहानंतर काही दिवसात निधन झाले. ही बातमी सोयराबाईंनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कळवलीच नाही.
सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करायचा हुकूम पन्हाळ्याचा किल्लेदारास सोडला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा त्यांचा डाव होता. या अवघड प्रसंगी सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वास्तविक हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. पण संभाजीराजे हे गादीचे हक्काचे वारसदार होते. तसेच शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात लवकरच औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर हल्ला करणार अश्या बातम्या येत होत्या. अशा प्रसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे होते. राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळी असणे दौलतीसाठी हानिकारक ठरेल याची हंबीररावांना जाणीव होती. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावला आणि अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. मोरोपंत पेशव्यांना त्यांच्या इच्छेविरूद्ध सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी कटात सहभागी केले होते. सोयराबाईंनी संभाजीराज्यांना जेवणातून विष खाऊ घालण्याचाही प्रयत्न केला होता, अशी इतिहासात नोंद आढळते; पण ते बचावले असे वाचायला मिळते
छत्रपती
१६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.
औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरूद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
१६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-- गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले

शारीरिक छळ व मृत्यू
त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली

पहेलवान

बस मध्ये गर्दी असते.
एक पहेलवान बस मधेय चढतो आणि जागा नसल्यामुळे तो बसचालक जवळील सीटवर बसतो.

बसचालक गाडी थोडी थांबवतो आणि तेवढ्यात तो खाली उतरतो.
बसचालक परत गाडी चढल्यावर तो इकडे तिकडे बघतो आणि काही तरी शोधतो.

तेवढ्यात, गाडी मधील पहेलवान बोलतो :-
"केव्हा पासून बघतोय तुम्ही तो दांडा (गिअर) काढण्याचा प्रयत्न करीत होतात मी एका दमात त्याला काढून फेकून दिला" :) :० :)) :०० 

मुन्नाभाई आणि सर्किट


एकदा मुन्नाभाई आणि सर्किट अमेरीकेला जात असतात.
तेव्हा ते इंग्लिश ची प्रॅक्टीस कशी करतात ते पहा...

सर्किट :-भाई!अमेरिका मे पता पुछनेका तो क्या बोलनेका?
मुन्ना :-धोबी घाट.
सर्किट :-भाय!इंग्लिश मे बोलनेका तो ?
मुन्ना :-अरे क्या तु तेरेको इतना नही आता.
सर्किट :-बोलो ना भाय.
मुन्ना :-Washington.....


सर्किट :-भाय! इधर आ कैसा बोलने का ?
मुन्ना :-Come here.
सर्किट :-फ़िर उधर जा कै्सा बोलने का?
मुन्ना :-पहले उधर जाने का और बोलनेका Come here.


सर्किट :-भाय! ये कैसे बोलने का,
"चल ए हवा आने दे "
मुन्ना :-simple hai,"Hey you move sideways,
late the Airforce come in.."


मुन्ना :-अभी मै पुछता हू तु बोल .
"ए मामू भेजा मत फ़िरा."
सर्किट :-"Mother's brother dont rotate my brain."


मुन्ना:-ये बोल,"इधर आ खजूर देता हू खर्चापानी"
सर्किट :-"खजूर याने date,"
"Come with me for a date i will pay u."

मुन्ना:-"अब ये बोल,अपून को बहोत सर्दि हो गएली है."
सर्किट :-"I got big winter in small nose..."
प्रोफ़ेसर:-"अकल बडी के भैस बडी?"
मुन्नाभाई:-"बोले तो पहले'DATE OF BIRTH'तो बता मामू...


मुन्नाभाई:-सर्किट, बोले तो ये’FORD'क्या है?
सर्किट:- क्या भाई!’FORD' गाडी है.
मुन्नाभाई:-तो फ़ीर ये 'OXFORD'क्या है?
सर्किट:-बोले तो सिंपल है भाई.
’OX’बोले तो बैल,’FORD'बोले तो गाडी.
"बैलगाडी"...........


मुन्नाभाई:-ए मामू! तु कितना पढा है ?
मामू :- B.A.
मुन्नाभाई:- साला दो अक्षर पढा है और वो भी उलटा.......

मुली कशा पटवाव्या…

मुली कशा पटवाव्या…
मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टच असतात
प्रेमात पडण्याच्याबाबतीत.
तशीही प्रत्येकाच ीच इच्छा असते
एकदा तरी प्रेमात पडावं. युजवली जवळपास
९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे तुज पाशी, परी तु
जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे आपलं ’प्रेम’
कुठे आहे ते ओळखू शकत नाहीत,ते वेळेवर न
ओळखल्या मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं
आणि मग हात चोळत बसावं लागतं.
प्रेम कोणावर करावं हा तर सगळ्यात
मोठा कधीही न सुटणारा प्रश्न. सगळ्यात सोपं
म्हणजे बालपणीची मैत्रीण.. ही म्हणजे अगदी सेफ
असते. पण होतं काय,
की ज्या मुलीला ( मुलींच्या बाबतीत मुलाला)
लहान पणी शेंबुड
पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं
असतं, मोठा झाल्यावर त्याची /
किंवा तिची ती नाक
पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही,
त्या मुळे सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट
दुर्लक्षिली जाते.. ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्के
लोकांच्या बाबतीत खरी असते, अगदी एक
टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात झालेलं
रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच लोकं
खरे शहाणे असतात.
आता यात दिलेल्या कलुप्त्या या फार
जुन्या काळच्या आहेत.. तरी पण
आजही त्या पर्फेक्ट ऍप्लिकेबल आहेत.

१) बसमधे आपल्या शेजारी बसलेली आणि नेमकं
तिकिट काढण्यासाठी तिच्याकडे सुटे पैसे नसणं,
आणी तो खविस कंडक्टर सुटे पैसे द्या नाहितर
खाली उतरा असं म्हणणार, तेवढ्यात
तुम्ही जवळचे सुटे पैसे काढून देता आणि……पुढे
तुमच्यावर अवलंबून कुठपर्यंत केस नेता ते.

२)ट्रेनमधेभरपूर मराठी वाचनीय साहित्य
घेउन चला, नशिबाने समोर एखादी सुंदरी असली,
तर ती नक्कीच तुम्हाला अहो, ते पुस्तक
जरा देता का वाचायला म्हणून पुस्तक मागेल,
आणि मग ओळख …. वगैरे….

३) खूप लोकप्रिय सिनेमाची तिन तिकिटे
काढावी. सिनेमा हाऊस फुल्ल जाणार आहे
याची खात्री करुनच हे काम करा. सिनेमा सुरु
व्हायची वेळ झाली की बाहेर
कोणाची तरी वाट पहातोय असा आव आणा,
आणि सारखं घड्य़ाळाकडेबघत रहा. हाउस फुल्ल
चा बोर्ड लागला की दोन सुंदर तरुणी ,
ज्यांच्याकडे तिकिटं नाहीत अशांना हेरून
त्यांना तिकिटं आहे त्याच किमतीत ऑफर करा..
आणि सांगा की आमचा मित्र यायचा होता पण
आला नाही म्हणून….
आता इथे दोन तिकिटंएक्स्ट्रॉ कशाला??? तर
याचं कारण म्हणजे मुली एकट्या कधीच
सिनेमाला जात नाही्त, एक तर बॉय फ्रेंड
तरी असतो, किंवा एखादी मैत्रीण
तरी असतेच.तुम्ही मैत्रिणी बरोबर
आलेल्या मुलीचा शोध घ्यायचाय हे ध्यानात
ठेवा.. जर एकही मुलगी भेटली नाही , तर तीच
तिकिटे.. मी ब्लॅक मधे घेतली आहेत असं म्हणून
चढ्या किमतीत कुणाही माणसाला विकून टाका.

४)टॅक्सी साठी उभे आहात, आणि बऱ्याच
वेळानंतर टॅक्सी आली की टॅक्सि हायर करुन
तिला लिफ्ट ऑफर करा..

५)मुंबईला मरिन लाइन्स वर फिरत
असतांना एकदम जोरात पाउस येतो,
आणि नेमकी तुमच्या समोर एक सुंदर ललना तयार
होऊन कुठे तरी जात असते, जवळपास कुठेच
आडोसा नाही, तेंव्हा प्रवास
करतांना नेहेमी मोठ्ठी छत्री घेउन चला काय
सांगावं कधी उपयोगी पडेल ते??…..

६) एखादी आपल्या घराच्या आसपास
रहाणारी सुंदरी हेरुन ठेवा.
तिची रोजची प्रवास करण्याची गाडी हेरुन
ठेवा, आणि तुम्ही पण शक्यतो त्याच गाडीने
प्रवास करा. एकदा तुम्ही स्टेशनवर उतरलात
की शेअर रिक्शा वगैरे साठी ऑफर करु शकता.
तिच्या येण्याच्यावेळाचे पण पालन करा.
म्हणजे पुढे जमण्याची शक्यता जास्त असेल.

७)मुलींमधले धार्मिक प्रवृत्ती फार वाढीस
लागलेली आहे , त्यामुळे सिध्दिविनायक,
साईबाबा इत्यादी चलतीच्या देवांच्या मंदिरात
जाणं सुरु करा. चेहेऱ्यावरशक्य तेवढे बावळट
भाव ठेऊन हातात, फुलांची परडी घेउन रांगेत
अशा तर्हेने उभं रहा, की तिच्या नजरेस
तुम्ही पडाल.एकदा तिचा विश्वास
बसला की तुम्ही इतरांसारखेनाही,
तेंव्हा हळूच ओळख वाढवायला हरकत नाही. अरे
वा…. तुम्ही पण
येता का सिध्दी विनायकाला?? जागृत
देवस्थान बरं कां.. असं म्हणत मंदिराच्या
कळसालाच बघून हात जोडा आणि पुढे तुमच्याच
हातात आहे सगळं….

८)गणपती विसर्जन ,दहीहंडी अशा इव्हेंट्स
कधीच चुकवू नका.अशा प्रसंगी मुलींना बाहेर
फिरायला खूप आवडतं.

९) टिपीकल मराठमोळ्या
मुली या नाटकालाच भेटतातच, इथे पण तशीच
दोन तिकिटं एक्स्टॉची आयडिया उपयोगी पडु
शकते.

१०)दुचाकी वर लिफ्ट द्या. शक्य होईल
तेंव्हा मी तिकडेच जातोय, चला तुम्हाला सोडून
देतो, असं म्हणून लिफ्ट द्यावी.
हल्ली चेहेरा ओढणीने झाकून प्रवास
करण्याची पद्धत आहे, म्हणजे कोणी ओळखेल
याची भिती नसते.

पुन्हा एक देवदास...

पुन्हा एक देवदास...
तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..                    
         
रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले..                                
तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही..                                
आता आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                
                                 
नसेल जाण, तर गेली उडत.. मी खैर करणार नाही..                                
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                
                                 
                                 
पहिल्यांदा CANTEEN  मध्ये पाहिलं तिला, च्यायला काय दिसत होती...                                
अरे KATRINA सुद्धा झक मारेल मित्रा,  अप्सरा  जणू भासत होती..                                
मी 'आ' वासून बघत राहिलो...   तसं अख्खं कॉलेजच 'चाट' पडलं होतं..                                
माझ्या त्या BORING LIFE मध्ये, काहीतरी INTERESTING घडलं होतं..                                
                                 
पण.. आता हा सलमान, आठवणीत तिच्या, रात्रंदिवस झुरणार नाही..                                  
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                
                                 
SCIENCE क्लासमध्ये ओळख झाली, अन् चक्क ती माझ्या नजदीक आली,                                
DARING करून 'मारला' PROPOSE...  ती लाजून 'इश्श' म्हणाली..                     ( ती तिकडे 'इश्श'..   आम्ही इकडे 'खुश्श'..  ;-D )                                
अहो काय SIXER मारली होती आपण?..'युवी'ने सुद्धा सलाम ठोकला असता..                                
पण चुकून नाही म्हणाली असती.. सांगतो.. माझा YORKER हुकला असता..                                
अहो.. पण प्रेम म्हणजे काय .. 'T20' MATCH वाटली का तिला??.. की झटपट उरकून गेली..                                
जन्मभराची 'कसोटी'... पण स्वतः 'RETIRED' आणि मला 'HURT' करून गेली..                                
                                 
पण माझी HIT-WICKET पुन्हा कोणी, आता जन्मात घेऊ शकणार नाही..                                
कारण.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                
                                 
                                 
सारस-कात्रज बाग तर सोडाच... आम्ही Z-BRIDGE सुद्धा  सोडला नाही..                                
खर तर वडा-पाव चे वांदे.. पण मी.. चकार शब्द सुद्धा काढला नाही..                                
अख्ख्या CLASS ला PARTY दिली ..आता  ती, त्यांची होणारी (?) वहिनी होती...                                
सकाळी E-SQUARE- संध्याकाळी Mc-D, साला.. तिची मात्र चैनी होती..                                
                                 
पै-पै'चा हिशोब मागावासा वाटतोय.. पण  तसलं काही करणार नाही..                                
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                
                                 
काय झालं असेल हो? का सोडलं असेल मला?                                
खऱ्या प्रेमाची किंमत कळली नसेल का तिला?                                
खरतर अजूनही मी तिच्यावरच जीवापाड प्रेम करतोय..                                
प्रेत्येक श्वास घेताना तिचीच आठवण काढतोय..                                
एकदा भातुकली मोडलीय.. आता परत खेळ मांडणार नाही..                                
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                
                                 
म्हणतात आयुष्यात हरून जगायचं नसतं..                                
काहीही झालं तरी निराश व्हायचं नसतं..                                
मी सुद्धा आता तिच्याच STYLE न जगायला शिकीन..                                
पण प्रेम या शब्दापासून चार हात अंतर राखीन                                
                                 
या पोरींच काही सांगता नाही येत.. कधीही CHOICE बदलू शकते                                
आणि माझ्या सारख्या देवादासांची दररोज भर पडू शकते        

don divas marathi kavita

दोन दिवस मराठी कविता
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।


- नारायण सुर्वे

marathi google transliterator


मराठी ( Marathi ) Typing 
Type in Marathi languages (Press Ctrl+g to toggle between English and Marathi)



Body